Gautami Patil
Gautami Patilesakal

Gautami Patil 'तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला....', गौतमी चांगलीच संतापली

मी काय महाराष्ट्राचा बिहार केला काय? गौतमीचा विरोधकांना सवाल
Published on

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या कार्यक्रमांमुळे आणि जास्त तर वादामुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील आणि गर्दी, कार्यक्रमात गोंधळ होणं हे समीकरण ठरलेलंच. गौतमीचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गौतमी अडचणीत सापडली असल्याचं दिसून येत आहे. गौतमीच्या नाशिकच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच होत्या. या कार्यक्रमाला लोक आलेच नाही.

तर बार्शीतील कार्यक्रमात गौतमी उशिरा पोहोचली. त्यामुळे आयोजक आणि गौतमीत वादावादी झाली. या दोन्ही गोष्टींमुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली आहे. तर काही ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. तर छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनी गौतमीला महाराष्ट्राचा बिहार करू नका असं म्हंटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर गौतमीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Gautami Patil
Gautami Patil: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा! मद्यपींच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तिने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्या आरोपावरही उत्तर दिलं आहे. 'मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?', असा सवाल गौतमी पाटीलने केला आहे.

Gautami Patil
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या! गौतमीची क्रेझ संपली?

तर नाशिकमध्ये चाहत्यांनी पत्रकारांना मारहाण केली. या प्रकारावर ती चाहत्यांवर चांगलीच भडकली. पत्रकारांना धक्काबुक्की मारहाण होणं चुकीचंच आहे. अशा गोष्टींचा निषेध केलाच पाहिजे, असं गौतमी पाटील म्हणाली. मला त्या गोष्टीची माहिती नव्हती. मी कार्यक्रमातून निघाले. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर मला कळलं. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही तिने यावेळी केलं आहे.

Gautami Patil
Gautami Patil: गौतमी पाटीलचा कार्यक्रम पडला चांगलाच महागात! सोलापुरात आयोजकावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com