Gautami Patil: सबसे कातिल.. गौतमी पाटीलच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर भेटीला.. डान्स अन् अभिनयाची जुगलबंदी

गौतमीच्या पहिल्या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय
gautami patil, gautami patil new movie, ghungaru, gautami patil news, ghungaru movie
gautami patil, gautami patil new movie, ghungaru, gautami patil news, ghungaru movieSAKAL

Gautami Patil Movie Ghungaru: गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलचं गाजतंय. लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटीलची सर्वांना ओळख आहेच. गौतमीच्या नृत्यावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर सुद्धा फॅन्स जीव ओवाळून टाकतात.

सबसे कातिल गौतमी पाटील असणाऱ्या गौतमीच्या पहिल्या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. घुंगरू असं या सिनेमाचं नाव आहे.

(lavani dancer gautami patil new marathi movie name ghungaru trailer out now)

gautami patil, gautami patil new movie, ghungaru, gautami patil news, ghungaru movie
Kangana Ranaut: त्या चाचा चौधरीने सर्वांसमोर माझ्या... करण जोहरवर कंगनाचे पुन्हा एकदा टिकास्त्र

घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसतेय. स्त्री म्हणून अन्याय झालेली एक लावणीसम्राज्ञी म्हणून गौतमी दिसतेय.

काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या सिनेमाबद्दल माहिती दिली होती. गौतमी म्हणाली... “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा."

gautami patil, gautami patil new movie, ghungaru, gautami patil news, ghungaru movie
Mukta Barve: जेव्हा दोन 'विद्या' एकमेकांना भेटतात.. मुक्ताची वंदनाताईसाठी खास पोस्ट

गौतमी पुढे म्हणते.. "या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे.

चित्रपटाचं शूटींग पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीखेची घोषणा करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असं आवाहन गौतमीने केलं होतं.

गौतमी आहे म्हटल्यावर वर मूव्ही हिट तर होणारच ना.. नादच खुळा सबसे कातील गौतमी पाटील.. महाराष्ट्रातच नाही तर आख्या देशात नंबर 1 राहील तुझा मुव्ही गौतमी.. अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी गौतमीच्या नवीन सिनेमाबद्दल उत्सुकता दर्शवली आहे.

गौतमीचा हा सिनेमा रिलीज कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण सिनेमाचा ट्रेलर इतका भारी आहे कि संपूर्ण सिनेमाच गौतमीच्या फॅन्सना नक्की आवडेल यात शंका नाही.

gautami patil, gautami patil new movie, ghungaru, gautami patil news, ghungaru movie
Man Dhaga Dhaga Jodate Nava: 'घटस्फोट शेवट नसून नवी सुरुवात' नवी कोरी मालिका.. स्टार प्रवाहवर भेटीला

सध्या सगळीकडे IPL चा फिव्हर दिसतोय. या मॅच दरम्यान आपल्या लाडक्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी झळकवल्या जाणाऱ्या पोस्टरमध्ये एका पठ्यानं थेट गौतमीच्या नावाचचं पोस्टर झळकवलं.

गौतमीच्या या पोस्टरमध्ये गौतमीच्या फोटोसोबत 'सबसे कातिल गौतमी पाटील' असं लिहिलं होत. हा सामना तर मुंबई इंडियन्स हारली मात्र काहीकाळ स्डेडिअममध्ये गौतमीची चर्चा मात्र रंगली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com