Mukta Barve: जेव्हा दोन 'विद्या' एकमेकांना भेटतात.. मुक्ताची वंदनाताईसाठी खास पोस्ट

मुक्ता बर्वेने सादर केलेला चारचौघीचा नाट्यप्रवेश विशेष गाजला.
Mukta Barve: जेव्हा दोन 'विद्या' एकमेकांना भेटतात.. मुक्ताची वंदनाताईसाठी खास पोस्ट

Mukta Barve post on Vandana Gupte: झी नाट्यगौरव पुरस्कार म्हटलं कि सर्वांना उत्सुकता असते विविध नाट्यप्रवेश पाहायची. टीव्हीवर घरबसल्या प्रेक्षकांना गाजलेल्या नाटकांचे प्रवेश पाहता येतात.

आजवर झी नाट्य गौरव मध्ये अशी पाखरे येती, वाडा चिरेबंदी, सही रे सही अशा अनेक गाजलेल्या नाटकांचे छोटे प्रवेश बघता आले.

यंदाही ‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२३’ अत्यंत खास झाला. या नाट्य गौरव पुरस्कार सोहळयात मुक्ता बर्वेने सादर केलेला चारचौघीचा नाट्यप्रवेश विशेष गाजला.

(marathi actress mukta barve special post on vandana gupte on marathi natak charchaughi)

Mukta Barve: जेव्हा दोन 'विद्या' एकमेकांना भेटतात.. मुक्ताची वंदनाताईसाठी खास पोस्ट
Kangana Ranaut: त्या चाचा चौधरीने सर्वांसमोर माझ्या... करण जोहरवर कंगनाचे पुन्हा एकदा टिकास्त्र

प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित चारचौघी हे नाटक पुनरुज्जीवित होऊन रंगभूमीवर गाजत आहे.

या नाटकात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारत आहे.

या नाटकाचे मराठी रंगभूमीवर १९९१ ला पहिल्यांदा प्रयोग सादर झाले. या मूळ संचात वंदना गुप्ते, दीपा श्रीराम, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर या चौघींनी भूमिका साकारल्या होत्या. पुनरुज्जीवित नाटकात मुक्ता बर्वे वंदना गुप्तेंची भूमिका साकारत आहे.

Mukta Barve: जेव्हा दोन 'विद्या' एकमेकांना भेटतात.. मुक्ताची वंदनाताईसाठी खास पोस्ट
या कोळीवाड्याची शान कोण? एकच पोरगी.. Vaidehi Parshurami

यंदाच्या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात वंदना गुप्ते यांच्या समोरच मुक्ताने चारचौघी नाटकातला गाजलेल्या फोन कॉलचा प्रवेश सादर केला. मुक्ताने वंदना गुप्ते यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून भावना व्यक्त केल्या आहेत.

मुक्ता लिहिते.. डबलसीट मधे सासू-सून म्हणुन एकत्र होतो, रूद्रम मधे आई- मुलगी म्हणुन आणि आता चारचौघी मधे तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणुन. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम..

जशी आहेस तशीच मस्त,बिनधास्त,दिलखुलास रहा. तुझ्या energy नी आम्हाला inspiration देत रहा.. झी नाट्य गौरव चे विशेष आभार या दोन ‘विद्या’ एकमेकांना भेटवल्या बद्दल..

ह्या वर्षीचा झी नाट्यगौरव २०२३ च्या 'जीवनगौरव पुरस्काराच्या' मानकरी ठरल्या 'वंदना गुप्ते'. २५ डिसेंबर १९७० रोजी, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी, द गोवा हिंदू असोसिएशनच्या, मंगला संझगिरी दिग्दर्शित ‘पद्मश्री धुंडीराज’ ह्या नाटकातून पहिल्यांदा रंगमंचावर आल्या.

तिथपासून ते ‘.. आणि वंदना गुप्ते’, ह्यांचा इथपर्यंतचा प्रवास खूप कष्टांचा होता. मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती.

मुक्ता बर्वेने चारचौघी नाटकातला प्रवेश सादर करून वंदनाताईंना अनोखी मानवंदना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com