Neerja Set Leopard News: मायरा वैकुळच्या हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला, सेटवर घबराट

अलीकडेच टीव्ही शो 'नीरजा'च्या सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला
Leopard enters the sets of Kamya Punjabi myra vaikul new TV show Neerja
Leopard enters the sets of Kamya Punjabi myra vaikul new TV show NeerjaSAKAL

Neerja Set Leopord News: माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच अभिनेत्री मायरा वैकुळ सध्या नीरजा या हिंदी मालिकेत काम करतेय. पण या मालिकेच्या सेटवरुन एक धक्कादायक अपडेट समोर आलीय.

अलीकडेच टीव्ही शो 'नीरजा'च्या सेटवर बिबट्या घुसल्याने गोंधळ उडाला. यामुळे दहशत निर्माण झाली आणि भीतीमुळे सेटवरील लोकांची अवस्था वाईट झाली.

नुकतेच 'नीरजा'च्या सुरुवातीचे काही भाग कोलकातामध्ये शूट करण्यात आले, त्यानंतर मुंबई फिल्मसिटीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोचे संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित होते. दरम्यान एक बिबट्या तेथे आला आणि सर्वांची घाबरगुंडी उडाली.

(Leopard enters the sets of Kamya Punjabi myra vaikul new TV show Neerja )

मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या लोकांना दिसत आहेत.

अनेकवेळा वन्य प्राणी सेटवर घुसले आहेत. यावेळीही तेच झाले. मिडीया वृत्तानुसार, नीरजा: एक नई पेहचान सेटच्या बाल्कनीतून बिबट्याने प्रवेश केला. सेटवरून बिबट्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

Leopard enters the sets of Kamya Punjabi myra vaikul new TV show Neerja
Coco Lee Death: हाँगकाँगची पॉप गायिका कोको ली यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन, संगीतविश्वाला धक्का

मुंबईतील गोरेगाव परिसरात 500 एकर जमिनीवर वन्य प्राण्यांचे दर्शन घडणे ही तिथल्या लोकांसाठी आणि सेटवर राहणाऱ्यांसाठी नवीन गोष्ट नाही. अनेकवेळा बिबट्याने रात्री उशिरा सेटवर घुसून सेटवर उपस्थित कुत्र्यांवर हल्ला केला आहे.

यावेळी नीरजाच्या सेटवर अनेक लोकांच्या उपस्थितीत बिबट्याने सेटच्या बाल्कनीतून प्रवेश केला. पावसामुळे सेटच्या आत टेरेसवर अनेक माकडे उपस्थित होती आणि हा बिबट्या त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने सेटवर आला होता.

पण समोरची गर्दी पाहून तो सेटच्या मागच्या बाजूला गेला. समोर बिबट्याला पाहून माकडे जोरजोरात ओरडू लागली. लोकांच्या गर्दीमुळे माकडांचा जीव वाचला. सुदैवाने कोणाला कसलीही दुखापत झाली नाही. या सर्व गदारोळात माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वैकुळ सुरक्षित आहे.

वर्षभरापूर्वी शाहीर शेखच्या वो तो अलबेला या मालिकेच्या सेटवर एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यावेळी दुसरे युनिट काही लोकांसह शूटिंग करत होते आणि त्यांनी बिबट्याचा पाठलागही केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com