Coco Lee Death: हाँगकाँगची पॉप गायिका कोको ली यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन, संगीतविश्वाला धक्का

ऑस्करमध्ये गाणारी ती पहिली आणि एकमेव चिनी गायिका होती
Singer CoCo Lee Dead at the of Age 48, Siblings Confirm
Singer CoCo Lee Dead at the of Age 48, Siblings ConfirmSAKAL
Updated on

Coco Lee Death News: हाँगकाँगची पॉप गायिका कोको ली यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झालंय.

ऑस्करमध्ये गाणारी ती पहिली आणि एकमेव चिनी गायिका होती, तिने आंग लीच्या "क्रौचिंग टायगर, हिडन ड्रॅगन" या पुरस्कार विजेत्या चित्रपटातील "अ लव्ह बिफोर टाइम" सादर केले.

(Singer CoCo Lee Dead at the of Age 48, Siblings Confirm)

डिस्नेच्या सुपरहिट फिल्म मिलानच्या मंदारिन आवृत्तीमध्ये कोको लीने मुख्य पात्राला आवाज दिला.

तिने 2001 च्या ऑस्करमध्ये क्रॉचिंग टायगर, हिडन ड्रॅगनच्या साउंडट्रॅकमधील एक गाणे देखील सादर केले. ऑस्कर गाणारी ती पहिली आणि एकमेव चिनी गायिका आहे.

Singer CoCo Lee Dead at the of Age 48, Siblings Confirm
Puneet Superstar: पुनितसोबतचा पंगा Jio Cinemas ला पडला महागात, Bigg Boss Ott 2 मधुन बाहेर हाकलताच...

गायिका कोको लीच्या बहिणींनी सांगितले की, तिने वीकेंडला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासुन ती कोमात गेली होती. कोको ली काही वर्षांपासून नैराश्याने ग्रस्त होती, असे तिची बहिणी कॅरोल आणि नॅन्सी यांनी इंस्टाग्रामवर लिहिले.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिने रविवारी घरी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु बुधवारी तिचा मृत्यू झाला.

Singer CoCo Lee Dead at the of Age 48, Siblings Confirm
Aishwarya Narkar ऐश्वर्या नारकरचं माहेरचं नाव माहीताये का?

"गेल्या 29 वर्षांत तिने केवळ तिच्या गाण्यांनी आणि डान्सने केवळ आम्हालाच आनंद दिला नाही, तर तिने आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात चिनी गायकांसाठी नवीन स्थान निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम देखील केले.

याशिवाय जागतिक स्तरावर चिनी लोकांनी चमकण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले," असं निवेदन लीच्या बहिणींनी लिहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.