आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा;कुटुंबाकडून आवाहन

कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarGoogle

गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात उपचार घेत आहेत. अजूनही आयसीयुमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण अद्याप त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नाही. डॉ.प्रतित समदानी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या उत्कृष्ट डॉकटरांची टीम लता मंगेशकर यांच्यावर उपचार करीत आहेत. पण लता दिदींचं वय पहाता सुधारणा होण्यास थोडा वेळ लागत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी काही चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत त्या कृपया देऊ नयेत,त्यांची प्रकृती स्थिर आहे असं मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी कळवलं आहे. तसंच,लता दिदी लवकर बऱ्या व्हाव्यात अनं घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनी मंगशेकर कुटुंबियांनी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Lata Mangeshkar
ठरलं! कंगना रनौत उत्तरप्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवणार?

लता मंगेशकर यांचं वय जवळ-जवळ ९२ वर्षे. त्या गेली दोन वर्ष घरातून कुठेही बाहेर गेलेल्या नाहीत. तरीही त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालीच. त्यांच्या घरात काम करणाऱ्या स्टाफची ये-जा सुरू असते. त्यांच्यापैकीच एकाचा रीपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आणि त्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीमुळेच लता दीदींना कोरोना झाल्याचं बोललं जात होतं. भारताची गानकोकिळा इतके दिवस आजारी आहेत त्यासाठी त्यांच्या चाहत्यांनीच नाही तर समस्त भारतवासियांनी देवाला साकडं घातलेलं आपण पाहिलंय. कुणी महापूजा घातली तर कुणी मंत्रजप केला आहे. त्यामुळे देवाला केलेली ही प्रार्थना फळो आणि लता मंगेशकर लवकर बऱ्या होऊन घरी परत येवो हीच इच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com