esakal | पॅरिसमधल्या रस्त्यावर 'प्रियाचा जलवा', नेटकऱ्यांकडून 'लाईक्सचा पाऊस'
sakal

बोलून बातमी शोधा

actress priya warrior

पॅरिसमधल्या रस्त्यावर 'प्रियाचा जलवा', नेटकऱ्यांकडून 'लाईक्सचा पाऊस'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयानं चाहत्यांना आपलेसं करणाऱ्या प्रिया वारिअरची (priya warrior) गोष्टच वेगळी आहे. ती सध्या सुट्ट्या इंजॉय करण्यासाठी मॉस्को (moscow)येथे गेली आहे. त्यावेळी तिथेही तिला चाहत्यांनी गराडा घातल्याचे दिसून आले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रिया नेहमी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करत असते. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतो. तिला सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. (priya prakash varrier latest photo moscow street looking very stylish yst88)

प्रियानं आता जो एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे त्यात तिनं गॉगल लावला आहे. ती कॅज्युअल लूकमध्ये असल्याचे दिसून येते. फॅन्सनं नेहमीप्रमाणे तिला लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ओरु अदार लव चित्रपटापासून प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यात तिनं एका गाण्यात जो मुद्राभिनय केला होता त्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. त्याचा प्रभाव अद्याप त्यांच्या मनात आहे.

हेही वाचा: 'येऊ कशी..'मधील 'मोमो'च्या भूमिकेतून बाहेर येणं अवघड- मीरा जगन्नाथ

हेही वाचा: राष्ट्रीय पुरस्कार तीनदा मिळवणाऱ्या सुरेखाजींचा प्रवास होता संघर्षमय

प्रियाच्या वेगळ्या अंदाजाला आतापर्यत 50 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या प्रियाला इंस्टाग्रामवर 7 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिनं एक युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. प्रियानं विंक आणि फायर गनच्या आधारे युट्युबवर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे. ती शेवटी चेक या चित्रपटात दिसली होती. चंद्रशेखर येलेती यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

loading image