Video: चप्पल घालून विजय प्रमोशनला गेला, रणवीरनं उडवली टर!|Liger Actor Vijay Deverakonda chappal look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liger Movie news

Video Viral: चप्पल घालून विजय प्रमोशनला गेला, रणवीरनं उडवली टर!

Liger Promotion Event: साऊथच्या विजय देवरकोंडाच्या लायगरची सध्या हवा आहे. काल त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. व्ही जगन्नाथ पुरी यांनी लायगरचे दिग्दर्शन केले (liger viral news) असून त्यात विजय देवरकोंडाची प्रमुख अभिनेत्री म्हणून (bollywood actress Ananya Pandey) अनन्या पांडे दिसणार आहे. लायगरचे प्रमोशनही जोरदारपणे सुरु आहे. त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट होत आहे. साऊथमधील काही शहरांमध्ये तर थिएटरमध्ये लायगरचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात (tollywood actor) आला होता. त्यावरुन प्रेक्षकांना त्याची किती उत्सुकता आहे हे लक्षात येईल. विजय देवरकोंडा हा त्याच्या प्रमोशनमध्ये ज्या अवतारात गेला त्याची चर्चा होताना दिसत आहे.

लायगरचे लाईव्ह प्रमोशन सुरु होते. त्यावेळी रणवीर सिंगनं विजयचं टी शर्ट काढून ते भिरकावून दिलं. तर त्याची चप्पलेवरुन टर उडवली. त्यावेळी रणवीर त्याला म्हणाला मला वाटलं माझ्याच चित्रपटाचे प्रमोशन आहे. रणवीरच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. रणवीरनं विजय देवरकोंडाची तुलना ही जॉन अब्राहमशी केली आहे. त्या इव्हेंटचा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे. मात्र काहींनी विजयला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. रणवीरला विजयनं प्रमोशनकरिता बोलावले होते. त्यावेळी अनन्याही स्टेजवर होती.

थोड्यावेळापूर्वी विजयनं अनन्याला त्या प्रमोशनच्या कार्यक्रमामध्ये किस केल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्यावेळी रणबीरला राग अनावर झाल्यानं तो त्या शोमधून निघुन गेल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून आले. प्रमोशनमध्ये विजयनं रणवीरला बोलावले होते. त्यानुसार तो गेला. मात्र विजयचा अवतार पाहून त्याला हसू आवरले नाही. त्यानं त्याबाबत त्याला सुनावले देखील. विजयची चप्पल पाहून रणवीरला काय बोलावे तेच कळेना, म्हणून त्यानं विजयला आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची आठवण करुन दिली.

हेही वाचा: Ranveer Singh: रणवीरचं न्युड फोटोशुट, ते पाहून चाहते आऊट!

रणवीर विजयला म्हणतोस वेलकम सर, वास्तविक यांची काही नव्यानं ओळख करुन द्यायची गरज नाही. मी जेव्हा त्याचा हा नवा अवतार पाहिला तेव्हा मला असं वाटलं की, हा माझ्याच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या इव्हेंटला आला आहे. त्याच्या चप्पलची स्टाईल हटकेच आहे. ते पाहिल्यावर मला जॉन अब्राहमची आठवण आली. विजयनं आता जे टी शर्ट परिधान केलं आहे ते मला पाहिजे. त्याचा स्वॅग मला आवडतो. त्यानंतर रणवीर विजयला घेऊन बॅकस्टेजला गेला. त्याचा लूक बदलून पुन्हा घेऊन आला. मात्र यासगळ्यात विजयच्या चप्पलची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती.

हेही वाचा: Ananya चा आव्हानात्मक प्रवास, हृता म्हणाली,'अक्षरशः रडायचे,कळवळायचे'

Web Title: Liger Actor Vijay Deverakonda Chappal Look Promotion Event Ranveer Singh Make Fun Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top