फेसबुकवर चित्रपट पाहा आणि कोरोनाग्रस्तांना मदत करा, अनिल कपूर यांनी केले आवाहन

anil kapoor
anil kapoor

मुंबई : गेले दोन महिने संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत बॉलिवूडचे अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत पुढे येत आहेत. अशातच अभिनेते अनिल कपूर देखील आता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी देखील वेगळ्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांना मदत करायचे ठरवले आहे. ते 'लायन्स गेट लाईव्ह! अ नाईट एट मुवीज' या उपक्रमाच्या माध्यमातून मदत करणार आहेत. याच उपक्रमातून अनिल यांनी 'फेसबुकवर चित्रपट पाहा आणि कोरोनाग्रस्तांना मदत करा.' असे आवाहन केले आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आणि यामधून इतरांनी देखील यामध्ये सहभागी व्हा असे आवाहन अनिल यांनी केले आहे. 'लायन्स गेट लाईव्ह! अ नाईट एट मुवीज' या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून लायन्सगेट इंडिया यांनी अलीकडेच एक अनोखा उपक्रम राबवला आहे. 

यामध्ये फेसबुकच्या सहकार्याने चित्रपटांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार असून यातून निधी जमा करण्यात येणार आहे. आणि या निधीतून अनिल कोरोनाग्रस्तांना मदत करणार आहेत. यासाठी अनिल कपूर यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. देश लवकरात लवकर या भीषण संकाटामधून बाहेर पडावा यासाठी बरीच मंडळी वेगवेगळ्या परिने मदत करत आहेत. यामध्ये ते आज या उपक्रमाच्या माध्यमातून दाखविला जाणारा 'नाऊ यू सी मी 2' हा चित्रपट लायन्सगेट इंडिया यांच्या फेसबुक पेजवर पाहण्याची विनंती करत आहेत. हा चित्रपट आज रात्री ८ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.

लायन्सगेट इंडियाच्या या उपक्रमांतून बरेच हॉलिवूड चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहेत. या उपक्रमामध्ये बरेच कलाकार सहभागी झाले आहेत. किनु रिविज, कियारा नाईटली यांचा यामध्ये विशेष सहभाग आहे. या उपक्रमात अनिल यांच्यासोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि अनन्या पांडे देखील सहभागी होणार असून या उपक्रमाला मदत करणार आहेत. सोशल मीडियाचा उपयोग करत बरीच कलाविश्वातील मंडळी कोरोनाग्रस्तांसाठी तसेच गरजूंसाठी मदत निधी उभारत आहे. ही मंडळी करत असलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. 

lionsgate live ropes in anil kapoor for its initiative with facebook

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com