
Lock Upp Fame Anjali Arora: अभिनेत्री अंजली अरोरा जिनं 'काचा बदाम' गाण्यावर केलेल्या नृत्यानं अनेकांना आधी घायाळ केलं आणि नंतर लॉकअप शो मध्ये एन्ट्री केल्यावर आपल्या सादगीनं सगळ्यांच्या मनाला काबिज केलं. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. दावा केला जात आहे की,तिचा एक MMS व्हिडीओ लीक झाला आहे,जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जवळ-जवळ सगळेच दावा करत आहेत कीत्या व्हिडीओत अंजली अरोराच दिसत आहे. चला जाणून घेऊया पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते.(Lock Upp fame Anjali Arora's alleged MMS video leaked online? what we know...)
त्याचं झालं असं की सोशल मीडियावर एक व्हिडीओ लीक झाला आहे,ज्याला पाहिल्यावर काहींचे म्हणणे पडले की ती अंजली अरोराच आहे तर काहींनी दावा केला आहे की त्या व्हिडीओत जी मुलगी आहे ती अंजली अरोरासारखी दिसते. या प्रकरणावर अद्याप अंजली अरोराची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. तसंही त्या व्हिडीओत अंजली अरोराच आहे याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे तो MMs अंजली अरोराचाच आहे हे बोलणं चुकीचं ठरेल.
अंजली अरोरा विषयी बोलायचं झालं तर तिला सोशल मीडियामुळेच अधिक प्रसिद्धि मिळाली. तिनं काचा बदाम वर काही सेकंदाचा डान्स करुनच ही प्रसिद्धि मिळवली होती. त्यामुळे ती रातोरात स्टार बनली होती. इन्स्टाग्रामवर देखील तिचे ११ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यानंतर एकता कपूरच्या लॉकअप या रिअॅलिटी शो मध्ये ती दिसली होती. त्या शो मध्ये लॉकअप शो चा विजेता ठरलेला मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा मधील केमिस्ट्रीला लोकांनी चांगलेच पसंत केले होते. दोघांच्या नावाचा हॅशटॅग देखील बनवला गेला होता. एकदा तर अभिनेत्रीनं मुनव्वरला प्रपोज देखील केलं होतं. आता हे देखील खरं आहे की शो संपल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले होते.
अंजली अरोरा सध्या डिजिटल क्रिएटर आकाश संस्सनवालला डेट करत आहे. तिनं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की,आकाश तिच्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यांच्यात खूप घट्ट नातं आहे. पण अद्याप त्यांनी या नात्याला नाव देण्यासाठी साखरपुडा वगैरे केलेला नाही. सध्या तिचे चाहते प्रतिक्षेत आहेत की लवकरच अंजली बिग बॉस ओटीटी मध्ये एन्ट्री करेल आणि त्यांचे भरपूर मनोरंजन करेल.