
Lockupp: नवी वॉर्डन तेजस्वी प्रकाश; 'फाटक्या' पण हटके ड्रेसमध्ये दिसली हॉट
टी.व्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. बिग बॉस 15 (Big Boss15) विनर बनल्यानंतर तर आणखीनंच लाइमलाइटमध्ये आली. तेजस्वी प्रकाश आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिचे फोटौ आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतात. तेजस्वीचा क्यूटनेस चाहत्यांना भलताच आवडतो. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले देखील आपण पाहतो. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यानंतर तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत.
तेजस्वी प्रकाशनं या व्हिडीओत युनिक ड्रेस घातला आहे. या व्हिडीओत तिला ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रेसमध्ये आपण पाहू शकतो. बर या शॉर्ट ड्रेसला खाली काळ्या रंगाच्या पट्ट्या लावून एक वेगळा लूक दिला गेलाय. ड्रेसला मॅचिंग असे सिल्व्हर कलरचे कानातले देखील तिनं घातले आहेत. कम्प्लीट हेवी मेकअप आणि न्यू हेअरस्टाइल सोबत तिचा लूक एकदम हटके दिसत आहे. तिनं या ड्रेसवर काळ्या रंगाचे शूजही घातले आहेत. यामुळे ती एकदम वेगळी दिसत आहे. या व्हिडीओत तेजस्वी प्रकाश आपल्या शूटसाठी निघालेली दिसत आहे,अर्थातच लॉकअपमध्ये(Lockupp).
हा व्हिडीओ आहे 'लॉकअप'च्या नवीन प्रोमोचा. प्रोमोच्या माध्यमातून खुलासा करण्यात आला आहे की लॉकअप ची वॉर्डन कोणी दुसरी नाही तर ती तेजस्वी प्रकाश आहे. या शो मध्ये तेजस्वी आल्यामुळे आता नवा ट्वीस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतोय की तेजस्वी प्रकाश स्टायलिश अंदाजात ल़ॉकअप मध्ये एन्ट्री घेतेय.
हेही वाचा: ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा
आता हे तर पक्क ठरलंय की तेजस्वीच्या या जबरदस्त एन्ट्रीनंतर शो मधून कुणाचंतरी एलिमिनेशन नक्कीच होणार आहे. या व्हिडीओवर तेजस्वीचे अनेक चाहते लाइक्स आणि कमेंट्स करीत आहेत. अर्थात तेजस्वीवर कौतूकाचा वर्षाव होत आहे तो वेगळा.
Web Title: Lock Upp Tejasswi Prakash To Join Karan Kundrra As Jail Warden
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..