ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा KGF Chapter 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR And KGF Chapter 2 Release dates...

ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा

कन्नड सुपरस्टार यशचा(Yush) केजीएफ चॅप्टर 2(KGF Chapter 2) सिनेमा बॉक्सऑफिसवर(boxoffice) एकामागून एका रेकॉर्ड तोडत आहे. श्रीनिधी शेट्टी,संजय दत्त आणि रविना टंडन सारख्या स्टार्सच्या अभिनयानं सजलेला केजीएफ 2 आता ओटीटीवर कधी येतोय याची सारे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत. आता या सिनेमाच्या बाबतीत एक गूडन्यूज कळाली आहे. बोललं जात आहे की केजीएफ 2 सिनेमाचे डिजिटल राइट्स करोडोला विकले गेलेयत. त्यामुळे हा देखील मोठा रेकॉर्ड आहे. पण याहूनही मोठी बातमी अशी आहे की RRR आणि KGF2 आता पाठोपाठ ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

हेही वाचा: नुसरत भरुचानं चक्क रस्त्यावर विकले Condom; म्हणाली,'जनहित में जारी...'

मीडिया रीपोर्ट्सनुसार केजीएफ 2 सिनेमाची डिजिटल डील जवळपास 320 करोडोंना झाली आहे. 27 मे,2022रोजी हा सिनेमा ओटीटीवर स्ट्रीम केला जाईल अशी बातमी आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी सांगितले गेले नाही. केजीएफ सिनेमा प्रदर्शित होऊन आता 21 दिवस झाले आहेत. या 21 दिवसांत केजीएफ 2 ने वर्ल्डवाईड 1054.85 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदी व्हर्जनसाठी हा आकडा जवळपास 373.30करोड पर्यंत पोहोचला आहे. केजीएफ चॅप्टर 2 ने आतापर्यंत 752.9 करोडची कमाई केली आहे. आणि अजूनही या सिनेमाची घोडदौड बॉक्सऑफिसवर सुरूच आहे.

हेही वाचा: घटस्फोटानंतर प्रेमात पडल्या; लग्न,लीव्हइन रीलेशनमध्ये रमल्या 'या' अभिनेत्री

एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाच्या रिलीज डेटचा देखील खुलासा झाला आहे. 1100 करोडपेक्षा जास्त कमाई करणारा आरआरआर झी5 आणि नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मीडिया रीपोर्ट्सनं दावा केला आहे की आरआरआर 20 मे, 2022 रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Kgf Chapter 2 Ott Release Date Digital Rights Buisness Its A New

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top