'लाॅक अप'च्या विजयानंतर मुनव्वरची डोंगरीमध्ये जंगी रॅली..

बहुचर्चित 'Lock upp' शोच्या विजयानंतर मुनव्वर फारुकीचे डोंगरीमध्ये चाहत्यांनी जाेरदार स्वागत केले.
Lock Upp Winner Munawar Faruqui Arrives in Dongri
Lock Upp Winner Munawar Faruqui Arrives in Dongrisakal
Updated on

Munawar Faruqui : बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगनाचा लॉक अप (Lock Upp) नावाचा शो गेली सत्तर दिवस भलताच चर्चेत होता. त्यामधील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. रोज नवे सत्य, नवे रहस्य आणि वाद यामुळे या शोकडे अनेकांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे हा शो अंतिम टप्प्यात आल्या पासून लॉक अप (lock upp winner) चा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाली आणि 'लॉक अप'चे विजेतेपद मुनव्वर फारुकीने पटकावले.

Lock Upp Winner Munawar Faruqui Arrives in Dongri
अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप

गेली सत्तर दिवस कॉमेडियन मुनव्वर फारुकीने (comedian Munawar Faruqui) प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुनव्वर फारुकी हा सुरुवातीपासूनच या खेळाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात होते. मुनव्वर विजेता होईल असा अंदाज अनेकांनी बांधला होता. त्याच्या स्वभावाने आणि खरेपणाने चाहत्यांची मनं जिंकली होती. लॉक अपमध्ये जाताच मुनव्वर याने आपली खरी बाजू खरी प्रेक्षकांसमोर ठेवली. त्याने आजवर बराच संघर्ष केला आहे. या शो मध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा धक्कादायक माहिती दिली.

विजयानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'ट्रॉफी डोंगरीत येत आहे. आज ३.३० वाजता.' त्यानंतर तो ट्रॉफी घेऊन तो डोंगरी मध्ये आला. त्यांनतर डोंगरीमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. यावेळी मुनव्वरच्या मागे पुढे गाड्यांचा मोठा ताफा होतो. जमलेले लोक त्यांचे कौतुक करत होते. घोषणा देत होते. यावेळी मुनव्वरने गाडीच्या टॉप रूफ मधून बाहेर येत डोंगरीकरांना ट्रॉफी दाखवली. मुनव्वरचा डोंगरीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com