
अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप
The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सनं गेल्या काही दिवसांपासून बॉ़लीवूडमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल ( Vivek Agnihotri) मीडियावर देखील या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याचे दिसून आले आहे. काश्मीरी पंडिताना 90 च्या दशकात सामोऱ्या जाव्या (Bollywood News) लागलेल्या अन्याय, अत्याचार यांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले असून त्यावरुन मोठा वादही झाल्याचे दिसून आले आहे. याच चित्रपटाचे अभिनेता अक्षय कुमारनेही कौतुक केले होते. पण ते सर्व खोटं असल्याचा गंभीर आरोप विवेक अग्निहोत्रींनीं केला आहे.
हेही वाचा: आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले ‘धर्मवीर’
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे अक्षय कुमारने (akshay kumar) कौतुक केल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही एक व्हिडीओ शेअर करत अक्षयचे आभार मानले होते. पण त्यांनीच आता अक्षयवर निशाणा साधला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, ' बॉलिवूडकडून या चित्रपटासाठी मला अजिबात पाठिंबा मिळाला नाही. याच वेळी रिलीज झालेला अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ फ्लॉप ठरला. याच कारणास्तव त्याला ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती करावी लागली.' असे खळबळजनक विधान विवेक यांनी केले.
पुढे ते म्हणाले, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालला. पण तुझा चित्रपट मात्र चालला नाही. हा प्रश्न सतत एका व्यक्तीला विचारला गेला तर ती व्यक्ती सारखं काय उत्तर देणार? आपल्या पाठी कोणीच आपलं कौतुक करत नाही. चित्रपटाचं कौतुक करणारा एकही मॅसेज कोणी मला केला नाही. अक्षय स्वतःच्या चित्रपटाचं प्रमोशन करायला जात होता तेव्हा त्याला ‘द कश्मीर फाइल्स’बाबत प्रश्न विचारले जात होते. मग अशावेळी त्याला नाईलाजाने कौतुक करावं लागलं.' असाही खुलासा त्यांनी केला .
Web Title: Vivek Agnihotri Said Akshay Kumars Praising Is Fake About The Kashmir Files
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..