
Ratna Pathak Shah Birthday: संभोग से संन्यास तक.. रत्ना आणि नसिरुद्दीन यांची कशी होती लव्ह लाईफ..
Ratna Pathak Shah Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पथक शाह यांचा वाढदिवस. रत्ना पाठक आज ६६ वर्षांच्या झाल्या.
रंगभूमीवर अभिनय करून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केलेल्या रत्ना पाठक यांनी पुढे सिनेमे, मालिका आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
बदलत्या माध्यमांशी जुळवून घेत रत्ना पाठक यांनी अनेक माध्यमांमध्ये काम केलं. रत्ना पाठक यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत लग्न केलं.
रत्ना आणि नसीर दोघेही स्वतंत्र आणि बेधडक विचारांचे. दोघांची लव्हस्टोरी सुद्धा प्रचंड बोल्ड आहे. नसीरुद्दीन आणि रत्ना जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा नसीर साबचं लग्न झालं होतं. दोघेही नाटकांमध्ये अभिनय करत होते.
१९७५ दोघांची गाठभेट झाली तेव्हा दोघेही आपापल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होते. नसीर आणि रत्ना एकत्र आले ते सत्यदेव दुबे दिग्दर्शित 'संभोग से सन्यास तक' नाटकाच्या निमित्ताने..
मुंबई थिएटरचे दिग्गज सत्यदेव दुबे दिग्दर्शित 'संभोग से सन्यास तक' या नावाच्या थिएटर नाटकात त्यांनी काम केले.पाहताक्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नसीर साबचं तेव्हा लग्न झालं होतं.
पण एकदा का माणूस प्रेमात असेल तर त्याला वयाचं आणि नात्याचं कोणतंही बंधन नाही. दोघे एकमेकांना डेट करू लागले. आणि १९८० दरम्यान त्या जमान्यात दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले.
पुढे नसीर साब आणि त्यांची पहिली बायको यांनी एकमेकांशी घटस्फोट घेतला. आणि ७ वर्ष एकमेकांना डेट करत १९८२ ला त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. नसीर आणि रत्ना यांच्यात १६ वर्षांचं अंतर आहे.
नसीर हे रत्नाचे १३ वर्ष सिनियर आहेत. जेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करत होते तेव्हा रत्ना १९ वर्षांची आणि नसीर ३४ वर्षांचे होते. या दोघांना विवान आणि इमाद हि दोन मुलं आहेत. हे दोघे सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत