
शोले चित्रपटामुळे त्यांचे नाव बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिले गेले.
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन चालण्यासाठी सोबतीला कुणी नव्हते. अशावेळी आपल्याला मोठी मजल मारायची आहे असा निर्धार करुन त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. तो प्रवास अद्याप सुरु आहे.
शोले आठवतोय, हा तोच चित्रपट ज्याची पटकथा जावेद आणि सलीम खान यांनी मिळून लिहिली होती. त्यातील महान गीतकार जावेद यांचा आज जन्मदिन. चार दशकांहून अधिक काळ आपल्या सदाबहार गीतांनी सर्वांना आपलेसं करणा-या जावेदजी यांना बॉलीवूडमध्ये फार सहजासहजी प्रवेश मिळाला नाही. तो मिळवण्यासाठी त्यांना फार झगडावे लागले.शोले चित्रपटामुळे त्यांचे नाव बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिले गेले. चित्रपट आणि साहित्य यांच्यातील कौतूकास्पद कामगिरीसाठी त्यांचे नाव आदरानं घेतले जाते. प्रख्यात शायर निसार अख्तर यांचे चिरंजीव म्हणून त्यांना ओळखले गेले. एवढा मोठा हात पाठीशी असतानाही जावेद यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.
17 जानेवारी 1945 मध्ये ग्वालियर मध्ये जावेद यांचा जन्म झाला. जावेद यांचे खरे नाव जादू असे आहे. त्यांचे वडिल निसार अख्तर यांच्या नज्म 'लम्हा किसी जादू का फसाना होगा' या रचनेवरुन त्यांचे नाव ठेवले होते. जावेद यांचे लहानपण हे लखनऊ या शहरात गेले. त्यांच्यावर पाकिस्तानी लेखक इब्न ए सफी यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यांच्या अनेक कलाकृतींनी आपल्या मनावर गारुड केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांना लहानपणी महान अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपट पाहणे खूप आवडायचे. यावेळेपासून त्यांची साहित्य, लेखन याकडे पाहण्याची समज बदलली. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जपली. चित्रपटाची कथा, त्याचे लेखन या क्षेत्रात आपण करियक करु शकतो असे त्यांना वाटू लागले होते.
विद्या बालनच्या 'नटखट'ला मिळाले ऑस्करसाठी नामांकन
मात्र बॉलीवूडमध्ये प्रवेश करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. त्यासाठी गेली कित्येक वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला. लेखणी झिजवावी लागली. जावेदजी 1964 मध्ये मुंबईला आले. त्यावेळी राहण्यासाठी त्यांच्याकडे घर नव्हते. तेव्हा त्यांनी चक्क झाडाखाली झोपून रात्र काढली आहे. दोन वेळच्या जेवणासाठी पैसेही नव्हते. त्यांना राहायला जोगेश्वरी येथे कमाल अमरोही यांच्या एका स्टूडिओमध्ये राहायला जागा मिळाली होती.जावेद यांची सलीम खान यांच्याबरोबर चांगली जोडी जमली होती. 70 च्या दशकात या जोडीनं एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले होते. त्यांनी एकूण 24 चित्रपटांची पटकथा लिहिली. त्याबरोबर संवादलेखनही केले.