'नदी रो रही थी तब कहा थे तुम,गुस्सा गुस्सा पाणी'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

समृध्द आयुष्य जगण्यासाठी पाण्याबरोबरच स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. आतापर्यत माणसाने त्याच्या स्वार्थासाठी जमीन, नदी यांचा वाट्टेल तसा वापर केला आहे.

मुंबई - जगभरात पाणी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी जगातील अनेक देश काम करीत आहेत. यंदाच्या वर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा दिला असला तरी दुसरीकडे अद्यापही काही जिल्हयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध संस्था जनजागृतीपर आवाहन करत आहेत. जेणेकरुन पाण्यासारख्या ज्वलंत विषयाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रसिध्द गीतकार प्रसुन जोशी लिखित आणि जगप्रसिध्द संगीतकार ए आर रेहमान याने संगीत दिलेलं एक गाणं नुकतचं व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात सहभागी झालेल्या लहान मुलांनी पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा आणि सर्वांचे जीवन वाचवा हा संदेश प्रामुख्याने देण्यात आला आहे. पाणी हा विषयच असा आहे की, त्यात कुठलाही भेदभाव नाही. वैश्विक प्रश्न म्हणून पाण्याकडे पाहिले जाते. आजही आशिया, आफ्रिका, खंडातील काही देशांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

पाण्याअभावी जीव गमवावा लागणा-यांची संख्याही मोठी आहे. यात मुक्या प्राण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अशा अनेक मुद्दयांना प्रसुन जोशी यांनी सुरेख शब्दांत मांडले आहे. रेहमान यांच्या संगीतानं गाण्याची उंची आणखी वाढली आहे. त्यामुळे हे गाणे कमालीचे श्रवणीय झाले आहे. पाणी वाचविणे, त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पाण्याबरोबरच स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. याचा विचाप करणे गरजेचे आहे. म्हणून तर नदी जेव्हा रडत होती तेव्हा सगळे कुठे होते असा प्रश्न गीतकाराने विचारला आहे. नदी, नाले यांची अवस्था कशी केली आहे, यामुळे जे काही अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे त्याला कोण जबाबदार? याकडे गाण्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. 

कोरोना काळातही बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी केली जबरदस्त कमाई

समृध्द आयुष्य जगण्यासाठी पाण्याबरोबरच स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. आतापर्यत माणसाने त्याच्या स्वार्थासाठी जमीन, नदी यांचा वाट्टेल तसा वापर केला आहे. त्यांची दुरवस्था झाली आहे. हे त्याच्या लक्षात नाही. याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. म्हणून यासगळ्या परिस्थितीचा जाब पुढची पिढी विचारेल त्यावेळी त्याचे उत्तर कोण देणार, तेव्हा आतापासून जे काही दयनीय झाले आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.

हे ही वाचा: भाग्यश्रीच्या मुलासोबत सन्या मल्होत्रा करतेय लग्न?      

स्वच्छतेबरोबर पाणी या प्रश्नाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. आतापर्यत पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा संदेश देऊन पाण्याविषयक जनजागृती करण्यात आली आहे. मात्र त्याच्या जोडीला स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे हे कुणी सांगत नाही. अशावेळी लहानमुलांनी एकत्रित येऊन गायलेलं हे गाणं सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lyricist prasoon joshi and music maestro ar Rahman song pani video viral on soc