सनी लिओनचे वादग्रस्त 'मधुबन' गाणे आता दिसणार 'या' वेगळ्या अंदाजात

अखेर गृहमंत्र्यांच्या आक्षेपानं करून दाखवलं;निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Sunny Leone
Sunny LeoneGoogle

बॉलीवूडला एखाद्या गाण्यावरनं,सिनेमाच्या नावावरनं,एखाद्या चित्रित प्रसंगावरनं किंवा मग कथानकावरनं ओढवलेले वाद काही नवीन नाही. त्यामुळे मग ब-याचदा निर्मात्यांनाच माघार घ्यावी लागली आहे. कारण करोडो रुपये खर्च करून बनवलेल्या कलाकृतीचे आर्थिक नुकसान त्यांना परवडणारेच नसते. अगदी छोटे-मोठेच नाही तर बड्या निर्मात्यांपासनं सगळ्यांनाच या वादाला सामोरे जावे लागले आहे. ब-याचदा धार्मिक भावना दुखावल्या जाऊनच एखाद्या कलाकृतीला वादात ओढले गेले आहे. आता हे सगळं सागायचं कारण म्हणजे सनी लिओनचे(Sunny Leone) 'मधुबन मे राधिका नाचे' या गाण्यालाही आता या धार्मिक वादाचा फटका बसला आहे. काय आहे नेमंकं प्रकरण जाणून घेऊया.

Sunny Leone
कतरिना कैफनं सलमान खानला शुभेच्छा देत म्हटलं,''तुझ्यासोबत कायम...''

२२ डिसेंबरला सनी लिओनवर चित्रित झालेले सारेगम म्युझिक आणि साकीब तोशी यांचं 'मधुबन में राधिक नाचे' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आणि काही तासाच्या आतच लाखो व्ह्युज मिळवत हीटही झालं. पण तेवढ्यातच मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावर आक्षेप घेत सनी लिओन-साकीब तोशी यांनी माफी मागावी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं हे गाणे तातडीने हटवावे,अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशी मागणी केली होती. ''काही लोकं सातत्याने हिंदू धर्मियांच्या भावनाचा अनादर करीत आहेत. भारतात राधेची मंदिरं अनेक ठिकाणी आहे. आपण तिची पूजा करतो. साकिब तोशी यांनी आपल्या धर्माबाबत अशी गाणी बनवावीत,आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नये''. असं नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं होतं. तेव्हा अर्थातच,आता निर्माता म्हणून सारेगम म्युझिकला धार्मिक वाद उद्भवू नये म्हणून या गाण्यावर निर्णय घेणं गरजेचं होतंच.

तेव्हा कंपनीनं या गाण्याचे 'मधुबन' हे नाव बदलतानाच गीतरचनाही बदलली जाईल अशी हमी दिली आहे. नवीन बदललेले गाणे तीन दिवसात सोशल साईट्सवर शेअर केले जाईल,तसंच जुने गाणे हटवले जाईल असंही निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या गाण्याचे आधीचे शब्द आहेत 'मधुबन मे राधिका नाचे,जैसे जंगल मे नाचे मोर' असे होते. ते बदलण्यात येणार आहेत. खरंतर हे मूळ गाणं मोहम्मद रफी यांनी कोहिनूर सिनेमासाठी गायलंय. तर सनी लिओनवर चित्रित झालेलं गाणं कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलंय. आता सर्वांच लक्ष लागून राहिलंय की 'मधुबन' या नावाजागी आता कोणता शब्द निर्माते आणणार आणि गाणं कोणत्या नवीन स्वरुपात दिसणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com