थरारक आणि उत्कंठावर्धक 'माफिया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

झी ५ वरील काली , काली 2 , लालबाजार आणि नक्षली आदी वेबसीरीजनी  प्रेक्षकांना चांगलेच  वेड लावले आहे. आता “माफिया ” ही नवीन  वेबसिरीज पुढील महिन्यात येत आहे. सस्पेन्स ड्रामा थ्रिलर अशी ही सीरीज आहे आणि प्रेक्षकांना ती खिळवून ठेवील असे दिसते.

मुंबई : झी ५ वरील काली , काली 2 , लालबाजार आणि नक्षली आदी वेबसीरीजनी  प्रेक्षकांना चांगलेच  वेड लावले आहे. आता “माफिया ” ही नवीन  वेबसिरीज पुढील महिन्यात येत आहे. सस्पेन्स ड्रामा थ्रिलर अशी ही सीरीज आहे आणि प्रेक्षकांना ती खिळवून ठेवील असे दिसते.

“माफिया”मध्ये सहा महाविद्यालयीन मित्रांची कथा आहे. महाविद्यालय पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षानंतर हे सर्व मित्र एकमेकांना भेटतात. या पाच वर्षांच्या कालावधीत हे सर्व मित्रांचे अंतरंग बदलले आहेत, त्यांची प्रत्येकाची पार्श्वभूमी हि एकमेकांना माहित आहे.

हेही वाचा: मुंबईतील रुग्णांचा आकडा पोहोचला तब्बल 61 हजारांच्या पार; जाणून घ्या आजची रुग्णांची आकडेवारी..

झारखंड राज्यातील घनदाट जंगलाच्यापृष्ठभूमीवर हे कथानक घडणारे आहे. मस्तीमौज, विश्वासघात, घृणा, निर्दयीपणा आदीचे मिश्रण या कथानकात आहे. मालिकेतील नितीन नामक मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेता नमित दास यांनी सांगितले की , माफिया या शब्दाचा अर्थ जसाच्या तसा नसून या शब्दाला फार विविध छटा तुम्हाला कथानकात दिसून येतील. 

हेही वाचा: काय म्हणावे या हिमतीला... चक्क पोलिस मुख्यालयातीलच एटीएम फोडले...

कथानकात प्रत्येक भागागणिक प्रेक्षकांना नवनवीन धक्के बसतील. कथानकात अशी काही वळणे येतील की ज्याचा प्रेक्षक विचार करू शकत नाहीत. बिरसा दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि एस के मुव्हीज द्वारा निर्मित “ माफिया “ मध्ये नितीनच्या भूमिकेत नमित दास , ऋषीच्या भूमिकेत तन्मय धनया, अनन्याच्या भूमिकेत ईशा साहा, नेहाच्या भूमिकेत अनिदिता बोस  आणि तान्याच्या भूमिकेत मधुरिमा रॉय प्रेक्षकांना दिसणार आहेत. 

maafia web series to be release soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maafia web series to be release soon