चंद्रचूडचा अंगावर काटा आणणारा अनुभव; "त्या अपघातामुळे माझं करिअर संपलं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrachur singh

चंद्रचूडचा अंगावर काटा आणणारा अनुभव; "त्या अपघातामुळे माझं करिअर संपलं"

'माचिस', 'जोश' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता चंद्रचूड सिंह Chandrachur Singh आठवतोय का? काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर चंद्रचूड इंडस्ट्रीतून अचानकच गायब झाला. यामागचं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. २००० मध्ये चंद्रचूडचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळेच त्याचं करिअर संपुष्टात आलं. (machis fame actor chandrachur singh on injury that threw his career off track)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड म्हणाला, "मी गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत होतो. त्यावेळी जेट स्कीईंग करताना माझा तोल सुटला. स्पीड बोड अत्यंत वेगाने पुढे जात होती आणि त्यात माझा उजवा हात खांद्यापासून पुढे खेचला जात होता. दैव बलवत्तर म्हणून त्या अपघातात माझा हात धडापासून वेगळा नाही झाला. जेव्हा मी खाली पडलो तेव्हा माझा उजवा हात स्नायू आणि त्वचेच्या आधारे लटकत होता. या अपघातानंतर मी आठ वर्षे घरीच होतो. इतका मोठा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीत काम मिळणं अवघड होतं."

या अपघातामुळे चंद्रचूडच्या करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. अपघातातून बरे झाल्यानंतर त्याने काही शूटिंगला सुरुवात केली होती. मात्र शरीरावर ताण आल्याने पुन्हा त्याला आरामाची गरज लागत होती. अनेक वर्षांनंतर चंद्रचूड 'आर्या' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राम माधवानी दिग्दर्शित या सीरिजमध्ये चंद्रचूडने सुश्मिता सेनसोबत भूमिका साकारली होती.