'मै कुवारी हूं, तेज कटारी हूं लेकिन सिर्फ तुम्हारी हूं 'म्हणत रिचा चढ्ढा घेऊन आली 'मॅडम चीफ मिनिस्टर'चा ट्रेलर

madam chief minister
madam chief minister

मुंबई- 'मै कुवारी हूं, तेज कटारी हूं लेकिन सिर्फ तुम्हारी हूं'. लोकांच्या घोळक्यात उभं राहून खणखणीत आवाजात 'मॅडम चीफ मिनिस्टर' घोषणा करते की ती मुख्यमंत्री बनण्यासाठी एकदम तय्यार आहे. असाच आहे रिचा चढ्ढाचा नवीन सिनेमा 'मॅडम चीफ मिनिस्टर'चा ट्रेलर जो नुकताच रिलीज झाला आहे. रिचा चढ्ढाच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये रिचाचा वेगळा अवतार दिसून येणार आहे. 

स्वभावात अकड असलेली मात्र मनाने प्रेमळ, रिचाची 'मॅडम चीफ मिनिस्टर' एक अशा मुलीची कहाणी आहे जी ना कोणासमोर वाकत आणि ना कोणा दुस-याला वाकू देत. स्वतःच्या कर्माने ती सत्तेच्या सगळ्याच उंच शिखरावर जाऊन पोहोचते. सुभाष कपूर यांचं दिग्दर्शन असलेला 'मॅडम चीफ मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतोय. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रिचा चढ्ढाचं ते रुप पाहायला मिळतंय जे याआधी कधीच पाहिलेले नाही आणि रिचाने देखील तिच्या सिने कारकिर्दीत असा वेगळा प्रयोग कधी करुन पहिलेला नाही. .

सिनेमाचा ट्रेलर पाहून असं दिसून येतंय की राजकारण, सत्तेसाठी होणारी रस्सीखेच, एकमेकांचे पाय खेचणं, खुर्ची मिळवण्याासाठी होणारं राजकारण या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. ट्रेलर पाहून सिनेमाच्या कथेचा- ब-यापैकी कोणालाही अंदाज लागू शकतो. यात स्पष्टपणे दिसून येतंय की ही एका दलित मुलीची कहाणी आहे जिचं समाजाने खूप शोषण केलं आहे. यानंतर मग कशाप्रकारे ती मुलगी समाजातील त्या दबलेल्या लोकांना बाहेर काढते आणि कशी स्वतःला 'मॅडम चीफ मिनिस्टर' बनवेल याबाबत फिरणारा हा सिनेमा आहे. 

दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी इशा-या इशा-यामध्ये देशाच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे. या सिनेमातील रिचाचा अभिनय, तिचा लूक  असं सगळंच चाहत्यांना प्रभावित करतंय. रिटा व्यतिरिक्त या सिनेमात सौरभ शुक्ला, मानव कौल देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. २२ जानेवारी रोजी हा सिनेमा थिटरमध्ये रिलीज करण्याची तयारी सुरु आहे.   

madam chief minister trailer video trending on youtube richa chadha film  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com