Made In Heaven 2 Controversy : 'एवढं वाटतं तर मग तुम्ही....!' मेड इन हेवनच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप

मेड इन हेवनच्या निर्मात्यांवर आता गंभीर आरोप करण्यात आले आहे.
Made In Heaven 2 Controversy
Made In Heaven 2 Controversy esakal

Made In Heaven 2 Controversy : बहुचर्चित अशा मेड इन हेवन या मालिकेचा दुसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट सारख्या वेगळ्या विषयावर आधारित या मालिकेची सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली आहे.

मेड इन हेवनच्या निर्मात्यांवर आता गंभीर आरोप करण्यात आले आहे. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमधील काही मुद्दे हे वादाचे कारण ठरताना दिसत आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रतिक्षा करत होते. आता त्याचा दुसरा सीझन प्रदर्शित होताच त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

दुसरीकडे ताहिलियानी एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या मालिकेतील मृणाल ठाकूरच्या एपिसोडवरुन वाद सुरु झाला आहे. ताहिलियानी यांनी एका मुलाखतीमध्ये मालिकेच्या डिझायनरवर टीका करत काही आरोप केले आहेत. त्यांनीच मेकर्सवर देखील निराशा व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मेकर्सनं ज्याप्रकारे डिझायनचे सादरीकरण करायला हवे होते ते केले नाही. त्यामुळे आता ते पाहताना योग्य वाटत नाही.

तुम्हाला जर अशीच मांडणी किंवा सादरीकरण करायचे होते तर मग अगोदर सांगायचे होते. त्यांनी एका कॉस्च्युम डिझायनरची नियुक्ती करायला हवी होती. पण तसे झाले नाही. म्हणून कित्येक गोष्टी खटकल्यासारख्या होत्या.

Made In Heaven 2 Controversy
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या मेड इन हेवनच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट काय असते हे त्यातून दिसून आले होते. दुसरीकडे वेगवेगळ्या वादांमुळे ही मालिका चर्चेत आली आहे.

Made In Heaven 2 Controversy
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com