
"या तिसऱ्या भागात प्रेक्षकांसाठी सरप्राइजसुद्धा असेल."
झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचा पहिला आणि दुसरा सिझन चांगलाच गाजला होता. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, वच्छी अशा सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. याच लोकप्रियतेमुळे आता ही मालिका तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
'ई टाइम्स टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत या मालिकेचे निर्माते म्हणाले, "होय, आम्ही या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय. मालिकेच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांना दमदार प्रतिसाद मिळाला होता. म्हणूनच आम्ही तिसरा भाग घेऊन येत आहोत. पहिला सिझन हा सीक्वेल, दुसरा सिझन प्रीक्वेल तर आता येणारा तिसरा सिझन फारच गूढ असणार आहे. आम्ही इतक्यात मालिकेतील कलाकारांच्या नावांची घोषणा करणार नाही, पण माधव अभ्यंकर हे अण्णांच्या भूमिकेत नक्कीच पुन्हा येतील. या तिसऱ्या भागात प्रेक्षकांसाठी सरप्राइजसुद्धा असेल."
हेही वाचा : अफलातून! प्राजक्ता गायकवाडचा लाठीकाठी करतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच
हेही वाचा : स्वानंदी बेर्डे आता होणार सौ. माने; नव्या प्रवासाला सुरुवात
२९ ऑगस्ट २०२० रोजी या मालिकेचा दुसरा सिझन संपला होता. निर्माता सुनील भोसलेच्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर या मालिकेचा प्रीक्वेल बनविण्यात आला आणि त्यालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मालिकेतील माधव अभ्यंकर यांनी साकारलेल्या अण्णांची खलनायकी भूमिका कमालीची गाजली. शेवंता आणि अण्णांची प्रेमकहाणीसुद्धा चर्चेत होती.