
Madhuri Dixit Bollywood Actress trolled mera dil ye pukare aaja social : बॉलीवूडची धकधक गर्ल ही नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तिनं आपल्या डान्सनं चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र आता माधुरी ही एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर एखाद्या व्हिडिओ जास्त प्रमाणात ट्रेंड होत असेल तर त्याची हवा बॉलिवूडला देखील लागते. आणि अशावेळी वेगवेगळे बॉलीवूड सेलिब्रेटी देखील या ट्रेंड वर आपली अदाकारी दाखवतात. बॉलिवूडची धक धक गर्ल आणि उत्तम डान्सर माधुरी दीक्षित देखील इन्स्टाग्रामवरील ट्रेंड गाण्यावर डान्स केला पण युजर्सने तिला जबरदस्त ट्रोल केले आहे.
हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर "मेरा दिल ये पुकारे आजा या रिमिक्स गाण्याचा खुप ट्रेंड चालू आहे". आयशा नावाच्या एका पाकिस्तानी तरूणींनी एका लग्नात या गाण्यावर डान्स केला आणि हा व्हिडिओ तुफान सारखा व्हायरल झाला . अनेकजण या गाण्यावर नाचताना दिसत आहे तर माधुरीने देखील या गाण्यावर डान्स केला आणि व्हिडिओ पोस्ट केला पण अनेकांना माधुरीचा डान्स नाही आवडला.
काही लोकांना हा व्हिडिओ आवडला तर काहींनी तिला क्रूरपणे ट्रोल केले. एकाने लिहिले, ‘माधुरी मॅम तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती" " किती ओव्हर अक्टिंग करते आहे " " माधुरी तुला नाही जमलं ग" " माधुरी मॅम तुम्ही तीची का अक्टिंग करता आहात" " तुम्ही तर एक टॅलेन्ट डान्सर आहात आणि हे काय करता आहात " एकाने तर चक्क माधुरीला पिऊन डान्स करते की बोलेले. "बंद करा आता हे गाणं डोकं उठलं आहे"
सध्या माधुरी दीक्षित झलक दिकला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून सहभागी झाली होती. अलीकडे माधुरी गजराज राव, ऋत्विक भौमिक आणि बरखा सिंग यांच्यासोबतचा आणि आनंद तिवारी दिग्दर्शित "माझा मा" काम केले. हा चित्रपट लवकरच Amazon Prime वर OTT प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.