Madhuri च्या ड्युप्लिकेटचा सोशल मीडियावर धुमाकूळ..धकधक गर्लचे पती श्रीराम नेनेही होतील कन्फ्यूज.. Madhuri Dixit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit

Madhuri च्या ड्युप्लिकेटचा सोशल मीडियावर धुमाकूळ..धकधक गर्लचे पती श्रीराम नेनेही होतील कन्फ्यूज..

Madhuri Dixit: धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्यानं आणि तिच्या अदांनी लाखो-करोडो लोकांचं मन जिंकून घेते. माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची बरोबरी करणारी हिंदी सिनेजगतात आजही कुणी नाही असं म्हटलं जातं.

पण माधुरीच्या लूक्सला सोशल मीडियावर एक मुलगी जोरदार टक्कर देताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षितच्या ड्युप्लिकेट्सचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे,व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी हुबेहूब माधुरी दीक्षित सारखी दिसते आहे.(Madhuri Dixit doppelganganger video viral on social media.netizens confuse)

हेही वाचा: Rakhi Sawant नंतर आता शर्लिन चोप्रानं टार्गेट केलं सलमान खानला, खिल्ली उडवत म्हणाली...

माधुरी दीक्षितची ड्युप्लिकेट म्हणजेच हुबेहूब तिच्यासारखी दिसणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर माधुरी सारखी दिसणारी मधु नावाची मुलगी लाल आणि गोल्डन रंगाची साडी नेसून नव्या नवरीच्या पेहरावात...मेकअप आणि दागिन्यांनी मढलेल्या अवतारात दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी एकदम माधुरीसारखे हावभाव करताना दिसत आहे.

माधुरी दिक्षितच्या या ड्युप्लिकेटला पाहून नेटकरी भलतेच कन्फ्यूज झाले आहेत. मधु नावाच्या या मुलीचे हावभाव अगदी सेम टू सेम माधुरी सारखेच आहेत...एका क्षणात ती पटकन असे काही माधुरीसारखे लूक देते की अगदी धक धक गर्लच जणू ती आहे असा भास होतो. आणि मग ही मुलगी मधु आहे की माधुरी हे ओळखता येणं कठीण होऊन बसतं.

लोक आता म्हणतायत,या मधुला जर श्रीराम नेने म्हणजे माधुरीचे पती जरी एकदा पाहतील तरी ते कन्फ्यूज होतील.