Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने 'चोली के पीचे क्या है'वर केला धमाकेदार डान्स

आता बी-टाऊनची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आगामी वीकेंड एपिसोडमध्ये दिसणार आहे.
madhuri dixit
madhuri dixitSakal

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 13' सध्या खूप चर्चेत आहे. शोमधील सर्व स्पर्धक आपल्या आवाजाने संपूर्ण देशाची मने जिंकत आहेत. आलेले खास गेस्ट पण स्पर्धकांच्या गाण्यांचे चाहते होतात. दर आठवड्याला एक ना एक सेलिब्रिटी शोमध्ये येतो. आता बी-टाऊनची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आगामी वीकेंड एपिसोडमध्ये दिसणार आहे. शोमध्ये तिने सर्व गायकांच्या गाण्यांचा आस्वाद घेतला, तसेच तिच्या आयकॉनिक गाण्यावर नृत्यही केले आहे.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शोचा नवीनतम प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित 1993 मध्ये आलेल्या 'खल नायक' चित्रपटातील 'चोली के पीचे क्या है' गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसत आहे. तिच्या डान्स मूव्ह आणि स्टाइल तुम्हाला जुन्या माधुरी दीक्षितची आठवण करून देईल.

madhuri dixit
Farzi Trailer : 'साला इतना पैसा कमाना है की मुझे...' फर्जीचा फाडू ट्रेलर एकदा पाहाच!

'इंडियन आयडॉल 13' मध्ये गेस्ट म्हणून दिसलेली माधुरी दीक्षित एका सुंदर अंदाजात दिसली. 55 वर्षीय माधुरीने पिवळ्या लाँग स्कर्टसह एम्ब्रॉयडरी चोली आणि स्टायलिश दुपट्टा घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने हिरवे कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. वेवी हेअर, पिंक लिप्स आणि न्यूड मेकअपमध्ये ती कहर करत होती. आजही माधुरी दीक्षित आपल्या फॅशनने तरुण अभिनेत्रींना स्पर्धा देते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

'इंडियन आयडॉल 13' बद्दल बोलायचे झाले तर, आजकाल विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया या शोला जज करत आहेत. या शोमध्ये सध्या ऋषी सिंग, बिदिप्ता चक्रवर्ती, देबोस्मिता रॉय, सेंजुती दास, सोनाक्षी कार, चिराग कोतवाल, नवदीप वडाली आणि शिवम सिंग हे स्पर्धक आहेत. शोमध्ये या आठवड्यात एक हाउस वाइफ स्पेशल देखील असेल, ज्यामध्ये 'मास्टर शेफ इंडिया'चे जज रणबीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com