Video: जिच्या हसण्यावर भलेभले व्हायचे फिदा,त्याच माधुरीला हे आज काय ऐकावं लागतंय...Madhuri Dixit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit trolled,jhalak dikhla jaa set viral video, users asked her about 'botox'

Video: जिच्या हसण्यावर भलेभले व्हायचे फिदा,त्याच माधुरीला हे आज काय ऐकावं लागतंय...

Madhuri Dixit: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित आजकाल डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' चं परिक्षण करत आहे. शो मध्ये माधुरीचे नेहमीच एकापेक्षा एक दिलखेचक लूक पहायला मिळत आहेत. या वीकेन्डच्या एपिसोडसाठी माधुरी सेटवर पोहोचली,त्यावेळी ती सी-ग्रीन रंगाच्या लेहेंग्यात पहायला मिळाली. ऑरेंज रंगाच्या बॉर्डरनं हा लेहेंगा सजलेला होता. माधुरीनं कानात ड्रेसला मॅचिंग दिसतील असे झुमके घातले होते. तर हातात रंगबिरंगी बांगड्या घालून माधुरीनं तिच्या लूकला चार चॉंद लावले होते. डान्स रिअॅलिटी शो चं शूटिंग मुंबईत फिल्म सिटीमध्ये होत आहे.(Madhuri Dixit trolled,jhalak dikhla jaa set viral video, users asked her about 'botox')

हेही वाचा: 'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यावरनं आता माधुरीला ट्रोल केलं गेल्याचं समोर आलं आहे. आणि ते ही तिला तिच्या सौंदर्यावरनं ट्रोल केलं जातंय हे मोठं आश्चर्य. नेटकऱ्यांनी माधुरीला तिच्या चेहऱ्यावरनं खूप उलट-सुलट सुनावलं आहे. पापाराझीला जेव्हा माधुरी दिक्षित पोझ देत होती तेव्हा त्यावेळच्या तिच्या स्माइलला नेटकरी 'आर्टिफिशियल' , 'फेक स्माईल' म्हणतायत. काही लोकांनी तर तिला थेट सवाल केलाय की, 'माधुरी तू बोटॉक्स सर्जरी केलीयस का?'

एका नेटकऱ्याने माधुरी दिक्षितच्या बोटॉक्स लूकवर कमेंट करत लिहिलं आहे,'हे तर जरा जास्तच बोटॉक्स आहे'. माधुरीनं आपल्या स्माइलसोबत काहीतरी केलं आहे,ते नैसर्गिक वाटत नाही. माधुरी दिक्षितचा मेकअप खूप जास्त झाला आहे ते देखील व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. माधुरीच्या चेहऱ्याची स्कीन इतकी टाइट वाटतेय की त्यामुळे स्पष्ट कळतंय की माधुरीनं बोटॉक्स करुन घेतलं आहे. आता बोटॉक्सची ट्रीटमेंट सर्रास करून घेतली जाते. अभिनेत्री तर डोळ्यांखालचा काळसरपणा,सुरकुत्या लपवण्यासाठी आणि स्कीन टाइट करण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतात.

हेही वाचा: घट्ट पॅंट घातली म्हणून इराणमध्ये अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते पाहून..

माधुरी दिक्षित सध्या 'झलक दिखला जा १०' ची परिक्षक म्हणून काम पाहतेय. माधुरी दिक्षितसोबत करण जोहर,नोरा फतेही या शो चे परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. माधुरीनं याआधीचा सिझन देखील केला होता 'झलक..'चा. सिनेमांपासून दूर असली तरी माधुरी वेबसिरीजमधनं मात्र आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसतेच अधनं-मधनं.