बापरे! ए.आर.रेहमानवर एवढे कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याचा लागला आरोप, वाचा काय आहे प्रकरण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

आयकर विभागाने ऑस्कर विजेत्या ए.आर.रेहमान विरुद्ध मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यानंतर मद्रास हायकोर्टाने ए.आर.रेहमानला नोटिस देखील पाठवली आहे. 

मुंबई- प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर.रेहमान अडचणीत आला आहे. रेहमान यांच्यावर आयकर विभागाने टॅक्स चुकवल्याचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर त्याच्या टॅक्स भरण्यामध्ये विसंगती देखील दिसून आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आयकर विभागाने ऑस्कर विजेत्या ए.आर.रेहमान विरुद्ध मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यानंतर मद्रास हायकोर्टाने ए.आर.रेहमानला नोटिस देखील पाठवली आहे. 

हे ही वाचा: मेगास्टार चिरंजीवींचा नवा लूक पाहिलात का? चाहत्यांसोबत मुलगा राम चरणलाही बसला धक्का  

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार ए.आर.रेहमान यांनी ३ कोटी ४७ लाख रुपये त्याच्या नावावर असलेल्या ट्रस्टमध्ये ट्रान्सफर केले आहेत. सोबतंच आयकर विभागाने २०११-१२ या वर्षातील रेहमान यांच्या टॅक्स पेमेंटमध्ये विसंगती आढळून आल्याचं म्हटलं आहे. वकिल डीआर सेंथिल कुमार यांनी म्हटलंय की, 'ए.आर.रेहमान यांना इंग्लंडमधील लिब्रा मोबाईल कंपनीने एक कॉन्ट्रॅक्टनुसार २०११-१२ मध्ये ३ कोटी ४७ लाख रुपये दिले होते. या करारानुसार तीन वर्षांसाठी रेहमान यांना कंपनीसाठी एक विशेष कॉलर ट्युन बनवायची होती.' 

ए.आर.रेहमान यांनी या कराराची रक्कम सरळ त्यांच्या ट्रस्टच्या नावावर करायला सांगितली होती. मात्र नियमानुसार ही रक्कम रेहमान यांना स्वतः घ्यायची होती आणि त्यावर टॅक्स दिल्यानंतरच ते ती रक्कम ट्रस्टला देऊ शकत होते मात्र रेहमान यांनी तसं केलं नाही. यामुळे आयकर विभागाच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायाधीस पीएस शिवज्ञानम आणि वी भारती यांच्या खंडपीठाने संगीतकार रेहमान यांना नोटीस पाठवली आहे.   

the madras high court has issued a notice to composer ar rahman for evading income tax  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the madras high court has issued a notice to composer ar rahman for evading income tax