मेगास्टार चिरंजीवींचा नवा लूक पाहिलात का? चाहत्यांसोबत मुलगा राम चरणलाही बसला धक्का

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

चिरंजीवी यांनी त्यांचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करुन सगळ्यांनाच प्रेमात पाडलं. सोशल साईटवर त्यांनी त्यांचा हा नवा लूक शेअर केला आहे जो चाहत्यांमध्ये धुमाकुळ घालतोय.

मुंबई- साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांनी गुरुवारी चाहत्यांना एक मोठा धक्काच दिला. चिरंजीवी यांनी त्यांचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करुन सगळ्यांनाच प्रेमात पाडलं. सोशल साईटवर त्यांनी त्यांचा हा नवा लूक शेअर केला आहे जो चाहत्यांमध्ये धुमाकुळ घालतोय. या नव्या बाल्ड लूकमध्ये देखील चिरंजीवींना चाहते पसंत करत आहेत. 

हे ही वाचा: साजिद खानवर मॉडेलने केले आरोप, १७ वर्षांची असताना केलं होतं लैंगिक शोषण  

मेगास्टार चिरंजीवी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन हा नवा बाल्ड लूक शेअर केला. या लूकमध्ये त्यांनी डोक्यावरचं सगळे केस काढून बाल्ड लूक केला आहे सोबतंच काळा गॉगल घालून स्टार लूक दिला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, अर्बन मंक म्हणजेच शहरी भिक्षुक. मी एका भिक्षुकासारखा विचार करु शकतो का? चिरंजीवी यांनी हा फोटो पोस्ट करताच कमेंटचा पाऊस पडायला लागला.

चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या या लूकवर स्वतःची प्रतिक्रिया दिली. मात्र यासगळ्यात एका कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही कमेंट दुस-या तिस-या कोणाची नाही तर ही कमेंट आहे चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण यांची. अभिनेता राम चरणने यावर कमेंट करत म्हटलंय, अप्पा, मी हे काय पाहतोय?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#UrbanMonk Can I think like a monk?

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela) on

लॉकडाऊन दरम्यान चिरंजीवी सोशल मिडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऍक्टीव्ह होते. अनेकदा त्यांनी त्यांचं कुकिंग कौशल्य देखील दाखवलं आहे. एकदा तर त्यांनी खास त्यांच्या आईची स्पेशल फिश रेसिपी देखील सांगितली होती.    

chiranjeevi shares pic of his new look ram charans reaction is priceless  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiranjeevi shares pic of his new look ram charans reaction is priceless