
धनुषला मद्रास High Court चे समन्स, 5 वर्ष जुनं बायलॉजिकल आई-वडील प्रकरण
दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या(Dhanush) विरोधात मद्रास हाय कोर्टांनं(Madras High Court) समन्स जारी केलं आहे. एका कपलनं दावा केला होता की धनुष त्यांचा मुलगा आहे त्या केस संदर्भात हे समन्स पाठवण्यात आलं आहे. ही केस जवळपास गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. आता या केस संदर्भात कोर्टांन धनुषला समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की,धनुषला मुलगा म्हणवणाऱ्या कपलचं नाव कथिरेसन आणि त्याच्या पत्नीचं नाव मिनाक्षी आहे. त्यांचा आरोप आहे की,प्रसिद्ध अभिनेता धनुष त्यांचा मुलगा आहे. तो खूप वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी घर सोडून चेन्नईला गेला होता.
हेही वाचा: शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...'
कथिरेसननं कोर्टात दावा केला आहे की,धनुषने पॅटर्निटी टेस्ट (पितृत्व परिक्षण)संदर्भातले कागदपत्र जमा केले आहेत. अभिनेता धनुषचा स्वत: ला पिता म्हणवून घेणाऱ्या कथिरेसन यांने यासंबंधी पोलिस तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यानं कोर्टात अपील केलं आहे की ही टेस्ट खोटी आहे आणि दोन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाला रद्द केलं जावं.
हेही वाचा: Met Gala 2022: 60 वर्ष जुना, 36 करोडचा ड्रेस घालणारी kim Kardashian चर्चेत
या अपीलनंतर कोर्टानं धनुषच्या विरोधात नोटीस जारी केली आहे. धनुषला स्वतःचा मुलगा म्हणवणाऱ्या या दाम्पत्यानं अपील करताना दावा केला आहे की धनुष त्यांचा तिसरा मुलगा आहे. तो इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी घर सोडून गेला होता. धनुषला आपला मुलगा म्हणवणाऱ्या या दाम्पत्यानं प्रत्येक महिन्याला धनुषकडून ६५ हजार रुपये मिळावेत अशी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार,धनुषनं या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. खरंतर,धनुष २०१७ मध्ये ही केस जिंकला होता. पण आता पुन्हा या दाम्पत्यानं या केसमध्ये पोलिस तपासाची मागणी केली असल्यानं केस पुन्हा सुरू ओपन झाली आहे.
Web Title: Madras High Court Summons Actor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..