शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...' Puja Mishra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja Mishra accused of sex scam on Shatrughan Sinha

शत्रुघ्न सिन्हांंवर मॉडेलचा Sex Scam चा आरोप, म्हणाली,'मला बेशुद्ध करुन...'

'बिग बॉस 5(Big boss) 'मध्ये दिसलेली अभिनेत्री पूजा मिश्रानं (Puja Mishra) ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप लावले आहेत. पूजा मिश्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य़ उद्धवस्त केल्याचा आरोप लावला आहे. इतकंच नाही तर पूजा मिश्रानं खुलासा केला आहे की,शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबानं तिचं लैंगिक शोषणही केलं आहे. शत्रुघ्न सिन्हा तिला बेशुद्ध करुन तिची देहविक्री करून पैसे कमावत होते. मला विकून त्यांनी सोनाक्षीला स्टार बनवलं असा मोठा आरोप पूजानं केला आहे. पूजा मिश्राचं म्हणणं आहे की तिनं वयाच्या १७ व्या वर्षी हे सगळं सहन केलं आहे. माझ्या हातात असतं तर मी आत्नहत्या देखील केली असती असं पूजा मिश्रा म्हणाली आहे. पूजा मिश्राच्या या आरोपानं खळबळ माजली आहे. त्या मुलाखतीत तिनं शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. मात्र यावर शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा: हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'

पूजा मिश्राचे वडील पद्माकर मिश्रा इन्कम टॅक्स ऑफिसर होते. ती म्हणाली,''माझ्या वडिलांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या मित्रांना करोडोची मदत केली होती पण तरिही त्याचं कुटुंब माझ्या मागे हात धुवून लागलं आहे''. पूजा मिश्रा पुढे म्हणाली,''बॉलीवूडच्या एका कुटुंबानं माझं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त केलं आहे. मी बोलत आहे शत्रुघ्न सिन्हा विषयी. ते माझ्या वडीलांचे चांगले मित्र होते. माझे वडील इन्कम टॅक्स विभागाचे हेड होते तेव्हा त्यांनी अनेकदा शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या मित्रांना वाचवलं आहे. दोन दशकं होत आली पण तरीही हे कुटुंब माझ्या मागे हात धुवून लागलंय. जेव्हा माझे वडील मुंबईत होते आणि सर्व्हिस करत होते तेव्हा पुनम सिन्हा यांनी त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं. सांगितलं होतं की,बॉलीवूडमध्ये फक्त वेश्या काम करतात. आणि मग यांची मुलगी कोण आहे? सोनाक्षी बॉलीवूडमध्ये काम करत आहे म्हणून यांनी माझा पत्ता कट केला. माझ्या वडीलांना बॉलीवूड संदर्भात चुकीचं सांगितलं''.

हेही वाचा: Met Gala 2022: 60 वर्ष जुना, 36 करोडचा ड्रेस घालणारी kim Kardashian चर्चेत

''माझे वडील निवृत्त होऊन जेव्हा पुण्याला निघून गेले तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी मला उघड-उघड त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या वर ब्लॅक मॅजिकही केलं. त्यांच्या मनात असुरक्षित भावना होती की मी प्रसिद्ध झाले तर काय होईल. माझ्याकडून जवळपास ३५ सिनेमे यांनी धोक्याने काढून घेतले. माझ्या रस्त्यात अडथळे आणले. मला मुर्ख ठरवू पाहत आहेत सिन्हा कुटुंब ते केवळ स्वतःला वाचवण्यासाठी. मला सांगतात तुझ्या हातातून सिनेमा शाहरुख,सलमानने काढून घेतले''. पूजा मिश्रानं शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबाला 'आप्पलपोटी' आणि 'राक्षस' संबोधत आरोप लावला आहे की,''जबरदस्ती माझ्या घरात घुसायचे. २००९ मध्ये मी जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी गेले होते तेव्हा मी कॅंडल्स गिफ्ट म्हणून घेऊन गेली होती. कारण त्यांचा वाढदिवस होता काही दिवसांनी. पण या लोकांनी मात्र माझ्या वडिलांना भाऊ मानून त्यांच्याच मुलीवर ब्लॅक मॅजिक करीत तिला बर्बाद केलं. यांना आप्पलपोटी णि राक्षस म्हणू नको तर काय म्हणू?''

Web Title: Pooja Mishra Accused Of Sex Scam On Shatrughan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top