Mahalakshmi : लग्नाच्या चार महिन्यांनी बोलली अभिनेत्री महालक्ष्मी; म्हणाली, मी जिवंत...

Mahalakshmi - Ravindra Chandrashekhar
Mahalakshmi - Ravindra Chandrashekhar
Updated on

नवी दिल्ली - दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीने चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखर यांच्याशी लग्न केले आहे. या लग्नाला चार महिने झाले आहेत. दोघांची प्रेम कहाणी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ते दररोज एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत असतात. आज रवींद्रने नुकताच महालक्ष्मीचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "माझा आनंद, आय लव्ह यू ...

रवींद्र चंद्रशेखरने पोस्टमध्ये पुढं म्हटलं की, आपल्या १०० दिवसांच्या सोबतीवर पोस्ट लिहिण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मला फार अलंकारित लिहिता येत नाही...तरी मला जे वाटतं ते मी लिहित आहे...

अम्मू.. तब्बल ३७ वर्षांनंतर मी १०० दिवसांतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगलो...हाच आनंद अधिक प्रेमाने, काळजीने, मौजमजेने, लढाईने चालू ठेवू. त्याचवेळी महालक्ष्मीने रवींद्रसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "आयुष्य सुंदर आहेच आणि तुम्हीही सुंदर आहात.

आणखी एका पोस्टमध्ये रवींद्रने लिहिले की, "माझ्या आयुष्यातील आठवे आश्चर्य म्हणजे "माझी बायको", या पोस्टवर महालक्ष्मीने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, "लोक काहीही बोलले तरी जोपर्यंत माझे हृदय धडधडणे थांबत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन." तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तूच माझे सर्वस्व आहेस.

कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं होतं. अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न आहे, तिला पहिल्या पतीपासून एक मुलगाही आहे. मात्र दोघांचं जमल नाही अन् ते वेगळे झाले. आता अभिनेत्रीने दुसरे लग्न केलं.

Mahalakshmi - Ravindra Chandrashekhar
Sena Divas : आज भारताचा 75 वा सेना दिवस, जाणून घ्या याचे मूळ!

महालक्ष्मीने 'वाणी राणी', 'चेल्लामे', 'ऑफिस', 'आर्सी', 'थिरु मंगलम', 'यमिरुक्का बायमेन' आणि केलाडी कन्मणी या मालिकांमध्ये काम केले आहे. तर रवींद्र चंद्रशेखर यांनी 'नलनम नंदिनीयम', 'सुता कढई', 'नटपुना एनू थेरियुमा' आणि 'मुरुंगकाई चिप्स' या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com