'महाराष्ट्र शाहीर'चा अंगावर काटा आणणारा नवा टीझर!| Maharashtra Shahir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shahir

Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'चा अंगावर काटा आणणारा नवा टीझर!

Maharashtra Shahir : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आता त्यांनी सोशल मीडियावर शेयर केलेल्या एका व्हिडिओनं तर तमाम मराठी रसिकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केदार शिंदे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील शेयर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमधून आपल्या नव्या चित्रपटाविषयीचे अपडेट्स शेयर केले होते. आताही त्यांनी पोस्ट केलेल्या नव्या टीझरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

त्या टीझरमधून महाराष्ट्र शाहीरचे पोस्टर देखील चाहत्यांना भावले आहे. वेगळ्या अंदाजातील ते पोस्टर कौतूकाचा विषय ठरताना दिसतो आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट करत आहे. या चित्रपटाची केली वर्षभर बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे.

केदार शिंदे गेली काही दिवस शाहीर साबळे यांचे अनेक किस्से शेयर करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे., केदार शिंदे यांनी त्यांच्या एका पूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ''एका सिनेमासाठी ३ वर्ष तयारी करताना काळ किती भरभर निघून जातो हे कळतच नाही.. कालचीच गोष्ट वाटते जेव्हा ही कल्पना डोक्यात आली..

या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका केदार यांची मुलगी सना शिंदे तर आजीची भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही देखील या चित्रपटातून समोर येणार आहेत. अभिनेता अतुल काळे ही यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत असतील. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.