‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळ्याची नामांकनं जाहीर

swapnil joshi and amey wagh
swapnil joshi and amey wagh

झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही हा  दैदीप्यमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पण या सोहळ्याचं हे वर्ष काहीसं खास असणार आहे. यंदाचा हा लोकप्रिय सोहळा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आता या सोहळ्याची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहेत.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये एकूण १२ श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका, फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे विविध पारितोषिकं वितरीत करण्यात येणार आहेत. प्रेक्षकांसाठी आपल्या लाडक्या कलाकारांना भरभरुन प्रेम देण्याची ही संधी आहे.

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘मी सिंधुताई सकपाळ’, ‘काकस्पर्श’, ‘दुनियादारी’, ‘लई भारी’, ‘सैराट’, 'मुळशी पॅटर्न ', ‘हिरकणी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना फेवरटे चित्रपटासाठी नामांकने मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दर्जेदार चित्रपटांमध्ये फेवरेट चित्रपटाचं विजेतेपद मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. प्रत्येक चित्रपट त्या त्या चित्रपटांमधील मुख्य अभिनेता व अभिनेत्री आणि त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रम आणि कामगिरीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. फेवरेट अभिनेता आणि फेवरेट अभिनेत्रीचं विजेतपद मिळवणंही कलाकारांसाठी काही सोप नसतं. फेवरेट अभिनेत्रीचं विजेतेपद मिळविण्यासाठी चित्रपटसृष्टीमधील ग्लॅमरस तसेच नव्या पिढीच्या अभिनेत्रींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. ‘नटरंग’ चित्रपटासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘सैराट’ चित्रपटासाठी अभिनेत्री ‘रिंकु राजगुरु’, ‘डबलसीट’ चित्रपटासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, ‘बकेट लिस्ट’ चित्रपटासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित, ‘दुनियादारी’ चित्रपटासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर यांसारख्या अभिनेत्रींना नामांकन मिळाली आहेत. 

नामांकनांची यादी- 
फेवरेट चित्रपट
- मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
- मी सिंधुताई सकपाळ
- काकस्पर्श
- दुनियादारी
- लई भारी
- डॉ. प्रकाश बाबा आमटे
- सैराट
- फास्टर फेणे
- मुळशी पॅटर्न
- हिरकणी

फेवरेट दिग्दर्शक
- संतोष मांजरेकर - मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
- महेश मांजरेकर - लालबाग परळ
- महेश मांजरेकर - काकस्पर्श
- संजय जाधव - दुनियादारी
- निशिकांत कामत - लय भारी
- परेश मोकाशी - एलिझाबेथ एकादशी
- नागराज मंजुळे - सैराट
- आदित्य सरपोतदार - फास्टर फेणे
- प्रवीण तरडे - मुळशी पॅटर्न
- संजय जाधव - खारी बिस्कीट

फेवरेट अभिनेता
- सचिन खेडेकर - मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
- सचिन खेडेकर - ताऱ्यांचे बेट
- सचिन खेडेकर - काकस्पर्श
- स्वप्नील जोशी - दुनियादारी
- रितेश देशमुख - लय भारी
- अंकुश चौधरी - डबल सीट
- आकाश ठोसर - सैराट
- अमेय वाघ - फास्टर फेणे
- सुबोध भावे - पुष्पक विमान
- ललित प्रभाकर - आनंदी गोपाळ

फेवरेट अभिनेत्री
- सोनाली कुलकर्णी - नटरंग
- तेजस्विनी पंडित - मी सिंधु ताई सपकाळ
- अमृता खानविलकर - झकास
- सई ताम्हणकर - दुनियादारी
- केतकी माटेगावकर - टाईमपास
- मुक्त बर्वे - डबलसीट
- रिंकू राजगुरू - सैराट
- सई ताम्हणकर - जाऊंद्याना बाळासाहेब
- माधुरी दीक्षित - बकेट लिस्ट
- सोनाली कुलकर्णी - हिरकणी

फेवरेट सहाय्यक अभिनेता
- सिद्धार्थ जाधव - लालबाग परळ
- जितेंद्र जोशी - झकास
- अंकुश चौधरी - दुनियादारी
- पुष्कर श्रोत्री - रेगे
- वैभव मांगले - टाइमपास २
- तानाजी गालगुंडे - सैराट
- सचिन खेडेकर - मुरांबा
- नागराज मंजुळे - नाळ
- प्रसाद ओक - हिरकणी

फेवरेट सहाय्यक अभिनेत्री
- विशाखा सुभेदार - मस्त चाललय आमचं
- सविता मालपेकर - काकस्पर्श
- उर्मिला कानिटकर - दुनियादारी
- तन्वी आझमी - लय भारी
- सई ताम्हणकर - क्लासमेट्स
- छाया कदम - सैराट
- शिल्पा तुळसकर - बॉईज
- मृणाल कुलकर्णी - ये रे ये रे पैसा
- मृणाल कुलकर्णी - फत्तेशिकस्त

फेवरेट खलनायक
- सयाजी शिंदे - गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
- सचिन खेडेकर - फक्त लढ म्हणा
- वैभव मांगले - काकस्पर्श
- जितेंद्र जोशी - दुनियादारी
- शरद केळकर - लय भारी
- सचिन पिळगावकर - कट्यार काळजात घुसली
- गिरीश कुलकर्णी - फास्टर फेणे
- प्रवीण तरडे - मुळशी पॅटर्न

फेवरेट गीत
- वाजले की बारा - नटरंग
- हे भास्करा - मी सिंधु ताई सपकाळ
- गणाधीशा - मोरया
- टिक टिक - दुनियादारी
- माऊली माऊली - लय भारी
- किती सांगायचंय मला - डबलसीट
- झिंगाट - सैराट
- हृदयात वाजे समथिंग - ती सध्या काय करते
- जाऊ दे न व - नाळ
- तुला जपणार आहे - खारी बिस्कीट

फेवरेट गायक
- अजय गोगावले, खेळ मांडला - नटरंग
- सुरेश वाडकर, हे भास्करा - मी सिंधु ताई सपकाळ
- अवधूत गुप्ते, गणाधीशा - मोरया
- सोनू निगम, टिक टिक - दुनियादारी
- अजय गोगावले, माऊली माऊली - लय भारी
- जसराज जोशी, किती सांगायचंय मला - डबलसीट
- अजय - अतुल, झिंगाट - सैराट
- कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर - बॉईज
- अजय गोगावले, देवाक काळजी रे - रेडू
- आदर्श शिंदे, तुला जपणार आहे - खारी बिस्कीट

फेवरेट गायिका
- बेला शेंडे - वाजलेकी बारा, नटरंग
- बेला शेंडे - आज मेरे घरा पावाना, बालगंधर्व
- उर्मिला धनगर - वेलकम हो राया वेलकम, देऊळ
- सायली पंकज - टिक टिक, दुनियादारी
- केतकी माटेगावकर - मला वेड लागले प्रेमाचे, टाईमपास
- आनंदी जोशी - किती सांगायचंय मला, डबलसीट
- श्रेया घोषाल - आत्ताच बया का बावरलं, सैराट
- आर्या अंबेकर - हृदयात वाजे समथिंग, ती सध्या काय करते
- वैशाली सामंत - खंडाळा घाट, ये रे ये रे पैसा
- रोंकिनी गुप्ता - तुला जपणार आहे, खारी बिस्कीट

फेवरेट पॉप्युलर फेस  
- सोनाली कुलकर्णी (Jr)
- क्रांती रेडकर
- केतकी माटेगावकर
- सई ताम्हणकर    
- अमृता खानविलकर
- प्रिया बापट
- रिंकू राजगुरू      
- वैदेही परशुरामी    
- शिवानी सुर्वे

फेवरेट स्टाईल आयकॉन    
- अंकुश चौधरी    
- अनिकेत विश्वासराव      
- स्वप्नील जोशी    
- रितेश देशमुख    
- आकाश ठोसर    
- अमेय वाघ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com