esakal | खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; सिद्धार्थ-मितालीच्या नव्या फोटोची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth chandekar and mitali mayekar

लग्नानंतर एकत्र निवांत वेळ घालवण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण निवडलं

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; सिद्धार्थ-मितालीच्या नव्या फोटोची चर्चा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठी कलाविश्वातील सध्या सर्वांत चर्चेत असलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. २४ जानेवारी रोजी या दोघांनी पुण्यातील ढेपे वाडा याठिकाणी लग्नगाठ बांधली. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर एकत्र निवांत वेळ घालवण्यासाठी हे दोघं लोणावळ्यातील 'द मचान' या रिसॉर्टमध्ये गेले. या रिसॉर्टमधील काही फोटो सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

मितालीचा #TinyPanda या नावाने इन्स्टाग्रामवर एक वेगळा अकाऊंट आहे. याच अकाऊंटवर तिने सिद्धार्थला किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या दोघांनी परदेशाचं एखादं ठिकाण न निवडता महाराष्ट्रातीलच लोणावळ्याची निवड केली. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या रिसॉर्टवरील सिद्धार्थ-मितालीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

हेही वाचा : 'लग्नानंतर कसं वाटतंय?'; मिताली मयेकरचं भन्नाट उत्तर

लग्नाच्या आधी तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मितालीच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने एका सरप्राइज पार्टीचं आयोजन करत तिच्या खास मित्रमैत्रिणींसमोर त्याने प्रपोज केलं होतं. जून २०२० मध्ये हे दोघं लग्नगाठ बांधणार होते. मात्र करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली.