खळखळून हसवायला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सज्ज.. ही आहे खास बात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtrachi hasya jatra is coming back from august 15 sony marathi

खळखळून हसवायला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सज्ज.. ही आहे खास बात..

sony marathi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) ह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. रसिकमायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने हैराण होतं, तेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःख, त्रास, टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा सुरू होतेय ही रसिकांसाठी पर्वणी असणार आहे.

(maharashtrachi hasya jatra is coming back from august 15 sony marathi)

संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. हास्यजत्रा ब्रेक घेतेय हे समजल्यावर रसिकांनी हळहळ व्यक्त केली. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोचला आहे.

येणाऱ्या नव्या पर्वात रसिकांना अनेक गोष्टी बघायला मिळतील. नवीन सेट, स्कीटचे वेगळे विषय, नवीन पात्रं आणि बरंच काही. निवेदिका प्राजक्ता माळी हिचं 'वाह दादा वाह' पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण बघायला मिळेल. समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय बघायला मिळतील. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा कधी सुरू होतेय आणि कधी रसिकांना खळखळून हसायला मिळतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यामुळे टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसवण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा येते आहे.