Prasad Khandekar: प्रसादला मिळाला 'नाट्यगौरव' पुरस्कार, पण त्याला आनंद वेगळ्याच गोष्टीचा... जाणुन घ्या

प्रसाद खांडेकर साकारत असलेलं अवली लवली कोहली हि भूमिका तुफान हिट झालीय
 prasad khandekar, prasad khandekar news, maharashtrachi hasyajatra news, maharashtrachi hasyajatra videos
prasad khandekar, prasad khandekar news, maharashtrachi hasyajatra news, maharashtrachi hasyajatra videosSAKAL

Prasad Khandekar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम प्रसाद खांडेकर लेखक - दिग्दर्शक म्हणून चर्चेत आहे. हास्यजत्रेतील अनेक विनोदी स्किट्स मध्ये प्रसाद त्याच्या अभिनयाने आणि लेखनाने रंगत निर्माण करतो.

प्रसाद खांडेकर साकारत असलेलं अवली लवली कोहली हि भूमिका तुफान हिट झालीय. अगदी या गाण्यावर मिम्स आणि व्हिडिओ सॉंग सुद्धा व्हायरल झालंय.

(maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar got natyagaurav puraskar)

 prasad khandekar, prasad khandekar news, maharashtrachi hasyajatra news, maharashtrachi hasyajatra videos
Ruchismita Guru: इंडस्ट्री पुन्हा हादरली! अभिनेत्रीचा नातेवाईकाच्या घरी संशयास्पद मृत्यू..

प्रसाद खांडेकरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. प्रसादला ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते नाट्यगौरव पुरस्कार मिळालाय. प्रसाद खांडेकरमी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

प्रसाद म्हणतो.. आजच्या ह्या रंगभूमी दिनी एक आनंदाची बातमी सगळ्यांनसोबत शेअर करायची आहे ती म्हणजे नुकताच मला 'विग्नहर्ता प्रतिष्ठान' तर्फे "नाट्यगौरव" पुरस्कार मला जाहीर झाला.

 prasad khandekar, prasad khandekar news, maharashtrachi hasyajatra news, maharashtrachi hasyajatra videos
Krutika Gaikwad: तुझ्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी

प्रसाद पुढे लिहितो.. आणि अजून एक सुखावणारी गोष्ट ही की हा पुरस्कार माझ्यासोबत माझा भाऊ सुशील इनामदार ह्याला सुद्धा जाहीर झाला ... विघ्नहर्ता प्रतिष्ठान च्या सगळ्या मान्यवरांचे खुप खुप खुप आभार.

आणि माझ्या नाटकावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मायबाप रसिकांना अभिवादन. रंगभूमी चिरायू होवो. अशा शब्दात प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्यात. अशाप्रकारे प्रसादला त्याच्यापेक्षा त्याचा मित्र आणि अभिनेता सुशील ईनामदारला पुरस्कार मिळाल्याचा जास्त आनंद आहे.

 prasad khandekar, prasad khandekar news, maharashtrachi hasyajatra news, maharashtrachi hasyajatra videos
Prasad Khandekar: केईएम रुग्णालयात तीन महिने उपचार अन्.. प्रसाद खांडेकरने सांगितला ‘तो’ प्रसंग..

प्रसादने काही दिवसांपूर्वी त्याच्या आयुष्यात घडलेल्या मोठ्या घटनेविषयी खुलासा केला, 'खरं तर मी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर १४साठी माझी निवड झाली होती.

इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर सगळंच थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर माझ्या आयुष्याला बरंच वळण मिळालं'

'त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं 'श्रीमंत दामोदर पंत'हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.'

अशाप्रकारे क्रिकेटपटू व्हायची इच्छा असलेला प्रसाद अपघाताने अभिनय क्षेत्रात आला आणि लोकप्रिय झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com