Samir Choughule: 'ते' स्किट भोवलं.. हास्यजत्रा फेम समीर चौगुलेवर आली माफी मागायची वेळ..

समीरच्या त्या कृतीमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आणि शेवटी हात जोडावे लागले..
Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance
Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance sakal

Maharashtrachi Hasyajatra : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने करोना काळातही आपल्याला हसवलं. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणूनही जबाबदारी पाहत आहे. आजवर त्याने आपल्या लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन केलं आहे.

समीर ने साकारलेला लोचण मजनू असो, शिवालीचा बाबा.. किंवा दाराचा आवाज.. त्याने कायमच आपल्या कलेचे जादू दाखवली आहे. पण आज त्यातल्याच एका स्किटनं आज समीर चौगुलेला अडचणीत आणलं आहे. त्याच्यावर अक्षरशः माफी मागण्याची वेळ आली आहे.

(Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance )

Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance
Ulgulan movie: फिल्मफेयर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाची मोठी घोषणा.. झाडीपट्टी नंतर आता..

समीर चौगुले हास्यजत्रेत (Maharashtrachi Hasyajatra)काही स्किटच्या दरम्यान तारपा नृत्य करताना दिसतो. तारपा हा आदिवासी समाजाचा लोकनृत्य प्रकार आहे. बऱ्याचदा विचित्र पद्धतीने 'तारपा' करून तो समीर विनोद निर्मिती करत असतो.

परंतु या नृत्याला समीर चुकीच्या पद्धतीने नाचून, त्या लोकनृत्य प्रकाराची अवहेलना करत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केला आहे. त्यावरून त्यांनी समीर चौगुलेची भेट घेऊन यावर आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नाही तर समीरला त्यासंदर्भात माफी मागायला लावली आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule apologized for making fun of adivasi tribal community tarpa dance
Vaibhav Mangale Birthday: ज्याला अख्खी इंडस्ट्री घाबरते, असा वैभव मांगले ती गोष्ट दिसताच भीतीने काढतो पळ..

एक व्हिडिओ आदिवासी समाजाकडून शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये समीर चौगुले तारपा नृत्य करताना दिसत आहे. त्यानंतर आदिवासी समाजातील काही कार्यकर्ते म्हणतात, 'आम्ही या प्रकाराचा निषेध करत आहोत. समीर चौगुले आणि त्यानंतर कुणीही या नृत्य प्रकारचा अवमान करणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ'

त्यानंतर समीर चौगुले यासंदर्भात माफी मागताना दिसत आहे, समीर म्हणतो, 'सध्या माझ्या एका एका प्रहसनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी तारपा नृत्य करतो असं सांगितलं होतं, पण तसं मी केलं नाही. जे स्किट मी सादर केलं त्यातून आदिवासी समाजाच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी सर्व आदिवासी बंधु भगिनींची माफी मागतो.'

'झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि असं पुन्हा कधीच होणार नाही याची ग्वाही देतो. या स्किट मधून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतु नव्हता आणि कधीही नसतो. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो' असे समीर म्हणाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com