
Shivali Parab: 'हास्यजत्रा’ फेम कल्याणची शिवाली परब झळकली हिंदी जाहिरातीत.. व्हिडीओ पाहाच..
Shivali Parab: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील कलाकार आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाले आहेत. त्यांच्या अभिनय, विनोद शैली यामुळे प्रचंड लोकप्रियता या कलाकारांना मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.
शिवालीची खरी ओळख 'हास्यजत्रा'तूनच झाली. कल्याणची ही पोरगी आपल्या अभिनयाने आता चुलबुली शिवाली परब म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. हास्यजत्रेच्या मंचावरील तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रभावित करून जाते. आता तर आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मोठी मजल मारली आहे.
(maharshtrachi hasyajatra fame actress shivali parab in hindi advertise video)
शिवाली नुकतीच एका हिंदी जाहिरातीत झळकली आहे. महिंद्रा फायनान्सची ही जाहिरात असून ज्यामध्ये शिवाली प्रमुख भूमिकेत आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
या जाहिरातीत शिवालीने कपडे शिवणाऱ्या सामान्य घरातील महिलेची भूमिका साकारली आहे. जिच्याकडे आपला उद्योग वाढवण्यासाठी पैसे नसतात आणि पुढे ती आर्थिक मदत मिळाल्याने आपल्या व्यवसाय मोठा करते, अशी ही जाहिरात आहे.
शिवालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत तीचं कौतुक केलं आहे. 'वा.. शिवा दीदी' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने 'क्यूट शिवाली' असं म्हटलं आहे. अनेकांनी कमेंट करत शिवालीचं अभिनंदनही केलं आहे.
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. हास्यजत्रेसोबतच शिवाली ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतही ती रूपाली हे पात्र साकारत आहे.