Aai Kuthe Kuthe Karte: सासूच करणार सुनेचं कन्यादान! अरुंधतीच्या लग्नाला अखेर कांचनमाला तयार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kuthe Karte kanchanmala agree for arundhati wedding with ashutosh

Aai Kuthe Kuthe Karte: सासूच करणार सुनेचं कन्यादान! अरुंधतीच्या लग्नाला अखेर कांचनमाला तयार..

Aai Kuthe Kay Karte: सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण आई म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भागाचे चित्रीकरण झाले असून लवकरच मालिकेत हा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे. पण हे लग्नं होणे तितके सोपे नाही. कारण आपल्या समाजात पुरुषांनी काहीही केलं तरी चालतं, पण बाईच्या अशा निर्णयाला मात्र विरोध केला जातो.

असाच विरोध अरुंधतीच्या लग्नालाही झाला, या निर्णयात तिला अनेक अडचणी आल्या पण त्या लाख अडचणींचा सामना करून अखेर अरुंधतीने लग्नाचा निर्णय घेतला, पण लग्नासाठी सासू सासऱ्यांनी कन्यादान करावं अशी इच्छा अरुंधती व्यक्त करते. पण कांचनमाला मात्र या लग्नाला पूर्ण विरोध दर्शवते.

(Aai Kuthe Kuthe Karte kanchanmala agree for arundhati wedding with ashutosh )

पहिलं लग्न, तीन मुलं आणि पंचवीस वर्षांचा संसार मोडून अरुंधतीला हा निर्णय स्वीकारणं थोडं अवघड होतं पण तिने ते केलं. नवऱ्याने फसवणूक केलेली असतानाही बाईने त्याच्या कलाने घ्यायला हवं अशी मानसिकता समाजाची असते.

त्यामुळे अनिरुद्धने दुसरं ;लग्न करूनही अरुंधतीने मात्र मुलांचा विचार करून दुसरं लग्न करून नये यासाठी अनिरुद्ध, त्याची आई कांचन आणि मुलगा अभिषेक जोरदार प्रयत्न करतात. एवढेच नाही तर कांचनमाला लग्नाच्या दिवशी लग्न सोडून मंदिरात निघून जाते.

आपल्या सुनेचं आपणच दुसरं लग्न लावून देणं हे काही कांचन यांना पटत नाही. पण अप्पा सुनेला लेकीसारखे मानतात म्हणून तिचे लग्न आणि कन्यादान मीच करेन असा शब्द त्यांनी दिलेला असतो. कांचन शेवटपर्यंत लग्नाला येत नाही. गुरुजी कन्यादान सुरू करतात. त्यावेळी कांचन बाईंना बोलावण्यात येते पण त्या तिथे नसतात.

गुरुजी कन्यादान सुरू करणार तोवर कांचनमाला येतात आणि म्हणतात, मी माझ्या मुलीचं कन्यादान करायला तयार आहे. अखेर सासू बाईंचं मन वळवण्यात अरुंधतीला यश येतं. नुकताच हा प्रोमो समोर आला असून त्याला तूफान प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Marathi Serialstar pravah