
Swara Bhasker: 'गांधी आम्हाला लाज वाटते...' महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ट्विटर हँडलवर अनेक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत ठेवून पोस्ट शेअर करत असते. यावेळी स्वराने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. मात्र यामुळे स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
सोशल मीडियावर स्वरा भास्कर ही कायम ऍक्टिव्ह असते. स्वराने नुकतेच महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्ताने ट्विटरवर एक ट्वीट केले होते. स्वराने या ट्वीटमध्ये “गांधी आम्हाला लाज वाटतेय, कारण तुमचे मारेकरी अजूनही जिवंत आहेत” असे म्हटले होते. तसेच स्वराने हॅशटॅग देताना गांधी जयंती आणि गांधीजी असे म्हटले होते यामुळे स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
आज महात्मा गांधींची 75 वी पुण्यतिथी आहे. ३० जानेवारी हा दिवस देशाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जातो. 1948 मध्ये याच दिवशी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. म्हणून महात्मा गांधींच्या स्मरणार्थ भारत त्यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करतो.
महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जगातील अनेक नेते अहिंसेचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानतात.