महेश बाबू, स्वरा भास्करला कोरोना

राज्यात गुरुवारी दिवसभरात ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली.
Mahesh Babu and Swara Bhasker
Mahesh Babu and Swara Bhasker

तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला (Mahesh Babu) कोरोनाची लागण झाली आहे. याआधी महेश बाबूची मेहुणी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. महेश बाबूने ट्विटर, इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. 'सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करूनसुद्धा, काळजी घेऊनसुद्धा मला कोरोनाची लागण झाली. मला सौम्य लक्षणं आहेत. घरातच मी स्वत:ला क्वारंटाइन केलं असून योग्य ते उपचार घेत आहे', असं महेश बाबूने स्पष्ट केलं. महेश बाबूने त्याच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. (Covid 19)

महेश बाबू काही दिवसांपूर्वीच कुटुंबीयांसोबत दुबईला गेला होता. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन त्याने दुबईत पत्नी आणि मुलांसोबत केलं. त्याच्याशिवाय आणखी एक तेलुगू अभिनेत्री आणि मंचू मोहन बाबू यांची मुलगी मंचू लक्ष्मीलाही कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही कोरोना झाला आहे. स्वरा आणि तिचे कुटुंबीय हे ५ जानेवारीपासून क्वारंटाइनमध्ये आहेत.

Mahesh Babu and Swara Bhasker
'आमचा साखरपुडा झाला नाही'; विराजसने चाहत्यांना केलं स्पष्ट

मुंबईत वीस हजारांचा टप्पा पार

राज्यात गुरुवारी दिवसभरात ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येत १० हजारांनी वाढ झाली. मुंबईत २०,१८१ रुग्ण आढळले. मुंबईत बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येने पंधरा हजारांचा टप्पा ओलांडला होता. गुरुवारी त्यात मोठी भर पडली. राज्यात आणखी ८९ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं.

ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित आहेत. तसंच लक्षणे असलेल्या रुग्णांमध्येही आजाराचं स्वरुप सौम्य आहे. ओमायक्रॉनमुळे आलेली ही तिसरी लाट तापाच्या साथीप्रमाणेच सौम्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, परंतु सावधगिरी बाळगणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com