Guntur Kaaram 1 Day : महेश बाबूच्या 'गुंटूर कारम' नं मोडलं 'पुष्पाचं' रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी 45 कोटींची विक्रमी कमाई!

साऊथच्या महेश बाबूच्या गुंटूर कारमनं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
Mahesh Babu's 'Guntur Kaaram
Mahesh Babu's 'Guntur Kaaramesakal

Mahesh Babu's 'Guntur Kaaram' : साऊथच्या महेश बाबूच्या गुंटूर कारमनं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. त्यानं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे दिसून आले आहे. याबाबत त्यानं अल्लु अर्जुनच्या पुष्पाचाही रेकॉर्ड ब्रेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्लु अर्जुनच्या पुष्पा द राईज नावाच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४४ कोटींची कमाई केली होती. तर महेश बाबूच्या गुंटूर कारमनं ४५ कोटींची कमाई करुन आपल्या नावावर वेगळा विक्रम केला आहे. त्याचे सगळीकडे कौतुक होत असून येत्या काळात हा चित्रपट तीनशे कोटींपर्यत मजल मारेल असेही बोलले जात आहे.

त्रिविक्रम श्रीनिवास यांनी दिग्दर्शित केलेल्या गुंटूर कारमला आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामधून जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. इंडिया टुडेनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या कमाईत ६६ टक्के वाटा तेलुगू प्रेक्षकांचा आहे.

गुंटूरच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यानं वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करण्याच्याबाबत त्यानं पुष्पाला मागे टाकले आहे. पण प्रभासच्या सालार आणि आदिपुरुषचं रेकॉर्ड मात्र कायम आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषनं पहिल्याच दिलशी ४८.५ कोटींची कमाई केली होती. तर सालारनं ६७.१ कोटीपर्यत मजल मारली होती.

महेश बाबूच्या गुंटूरविषयी आणखी बोलायचे झाल्यास त्याचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केले आहे. त्यामध्ये महेश बाबूनं लीड रोल केला आहे. २०२२ मध्ये जेव्हा त्याचा सरकारु वारी पाटा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून गुंटूर करमची चर्चा रंगली होती. आता तो प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्यामध्ये महेश बाबूनं केलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

महेश बाबूशिवाय या चित्रपटामध्ये मीनाक्षी चौधरी, श्रीलिला यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. त्याचे संगीत दिग्दर्शन एस थमन यांनी केले असून त्याचीही चांगलीच चर्चा होत आहे. हरिका आणि हसीन यांच्या वतीनं निर्मिती करण्यात आलेला गुंटूर करम या १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी देखील विशेष कौतुकाचा विषय आहे. मनोज परमहमसा आणि पीएस विनोद यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com