Kurchi Madathapetti: 'श्रीलीला'नं समंथा, तमन्नाला पाडलं फिकं, महेश बाबूसोबतच्या 'त्या' गाण्यावर काय नाचलीय!

श्रीलीला अन् महेश बाबूच्या गुंटूर कारममधील (Guntur Kaaram) त्या गाण्यावरील डान्स आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
Mahesh Babu Sreeleela Kurchi Madathapetti Song
Mahesh Babu Sreeleela Kurchi Madathapetti Songesakal

Mahesh Babu Sreeleela Kurchi Madathapetti Song : महेश बाबूच्या गुंटूर कारम (Guntu Kaaram Movie) चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतूरतेनं वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्रीन सिग्नल देत आपली पसंती दर्शवली आहे. मात्र त्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती श्रीलीलाच्या गाण्याची.

जेव्हा केव्हा बॉलीवूड आणि साऊथमधील डान्सची चर्चा रंगते तेव्हा साऊथ (Bollywood Vs South) चित्रपटातील गाणी आणि त्यातील डान्स हा उजवाच ठरल्याचे दिसले आहे. मग तो समंथाचा ऊ अंटावा गाण्यातील डान्स असो किंवा गेल्या वर्षी तमन्नाचा जेलरमधील काबालिया गाण्यावरील डान्स असो, यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

आता सध्या सोशल मीडियावर श्रीलीला आणि महेश बाबू च्या गुंटूर कारम (Mahesh Babu Sreeleela Kurchi Madathapetti Song Viral) चित्रपटातील गाण्याची चर्चा सुरु आहे. त्यांनी कुरुची मधापेट्टी नावाच्या गाण्यावर केलेला डान्स लोकप्रिय होताना दिसतो आहे.त्यांच्या या गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला असून त्याला आतापर्यत तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या श्रीलीला प्रसिद्धीच्या झोतात आहे.

ज्यांनी समंथाचं ऊ अंटावा, तमन्नाचे काबालिया आणि रश्मिकाचे सामी सामी नावाचे गाणे पाहिले असेल त्यांना श्रीलीलाचा तो डान्स पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी तिचा रा रा रेड्डी गाण्यावरील (Mahesh Babu News) डान्स देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. चाहत्यांनी श्रीलीलाच्या कुरुची गाण्यातील डान्सची तुलना ही समंथा आणि तमन्नाच्या गाण्यासोबत केली आहे. त्यांनी श्रीलीलाचा डान्स किती प्रभावी आहे हे त्यांच्या कमेंट्समधून सांगितले आहे.

Mahesh Babu Sreeleela Kurchi Madathapetti Song
Kiran Rao: 'मला त्याची 'एक्स वाईफ' का म्हणता', किरण राव एवढी का संतापली?

२२ वर्षीय श्रीलीला ही आता तिच्या डान्समुळे लोकप्रिय झालेली दिसत आहे. त्या गाण्यावर तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. १२ जानेवारीला महेश बाबू आणि श्रीलीला यांचा गुंटूर कारम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com