
महेश बाबुला म्हणावं आता बोल, भावानचं ६० व्या वर्षी केलं चौथं लग्न! Naresh Babu Wedding
साउथ अभिनेता महेश बाबू याचा सावत्र भाऊ नरेश याचे पवित्रा लोकेशशी लग्न केले आहे. अभिनेता नरेश बाबूचं हे चौथं लग्न आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी 44 वर्षीय अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्नगाठ बांधली आहे.
नरेशचे लग्न अगदी साधेपणाने झाले आणि त्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाचा व्हिडिओ नरेश बाबू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना नरेश बाबूने लिहिले की, "आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांती आणि आनंद मिळावा यासाठी तुमच्या आशिर्वादाची गरज आहे." व्हिडिओमध्ये नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश मंडपात लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. मंडपाभोवती अनेक पाहुणेही दिसतात.
नरेश यांनी शेअर केलेल्या ४२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये लग्नाचे सर्व विधी दाखवण्यात आले आहेत. यामध्ये नरेश आणि पवित्रा एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. याशिवाय दोघेही एकमेकांचे हात धरून मंडपाभोवती फिरताना दिसत आहेत. व्हिडीओवर चाहत्यांनी अभिनंदनाचे संदेश देत आहेत.
हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
पवित्रासोबत लग्न करण्यापूर्वी नरेश यांनी तीन लग्न केले आहेत. त्यांचे पहिले लग्न ज्येष्ठ डान्स मास्टर श्रीनू यांच्या मुलीसोबत झाले होते. त्या लग्नापासून दोघांना नवीन विजयकृष्ण नावाचा मुलगा झाला.
त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार देवुलपल्ली कृष्ण शास्त्री यांची नात रेखा सुप्रिया हिच्याशी त्यांने लग्न केलं. यानंतर त्याने आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या रम्या रघुपतीशी लग्न केले. या लग्नापासून नरेश आणि रम्याला एक मुलगा आहे.
रिपोर्ट्सनुसार, त्यांची तिसरी पत्नी रम्याने नरेशवर पवित्रासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. पवित्रा आणि नरेश दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्तात म्हटले आहे. अनेकवेळा त्याने या वृत्तांचे खंडन केले असले तरी अखेर गेल्या वर्षी त्याने नाते स्वीकारले. आता हे दोघ लग्न बंधणात अडकले आहे.