esakal | जिया खानच्या गळ्यात हात टाकलेला महेश भट्ट यांचा व्हिडिओ होतोय मोठ्या प्रमाणावर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh bhatt  jiah khan

रियाचे महेश भट्ट यांच्याशी असलेले संबंध यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता तर महेश भट्ट आणि जिया खान यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

जिया खानच्या गळ्यात हात टाकलेला महेश भट्ट यांचा व्हिडिओ होतोय मोठ्या प्रमाणावर व्हायरल

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यनंतर रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबिय चर्चेत आले आहेत. रियाचे महेश भट्ट यांच्याशी असलेले संबंध यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दोघांचेही जुने व्हिडिओ आणि व्हॉट्सअप चॅट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. आता तर महेश भट्ट आणि जिया खान यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: कपिल शर्मासोबत पुन्हा झळकणार सुनील ग्रोव्हर? 

या व्हिडिओमध्ये महेश भट्ट जिया खानसोबत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जिया त्यावेळी केवळ १६ वर्षांची होती. महेश भट्ट यांनी त्यांचा हात तिच्या गळ्यात टाकला आहे. दोघेही हसत आहेत. मात्र जिया थोडी नाराज दिसत आहे. असं म्हटलं जातंय की हा व्हिडिओ २००० सालाच्या आसपासचा आहे. रिया चक्रवर्ती महेश भट्ट यांना खूप मानते. सुशांतचं घर सोडल्यानंतर तिने महेश भट्ट यांना मेसेज देखील केले होते. रियाच्या कॉल डिटेल्समधून महेश भट्ट यांच्याशी ती अनेकदा बोलली असल्याचं समोर आलं आहे.यामुळे महेश भट्ट यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. 

महेश भट्ट यांच्या वागणुकीवरुन सोशल मिडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर रिया आणि महेश यांचे एकत्र जे फोटो व्हायरल झाले होते ते पाहूनही नेटकरी संतापले होते. रियाच्या फोटोंनंतर आता जियासोबत महेश यांची वागणूक पाहून सोशल मिडियावर नेटक-यांचा संताप अनावर होत आहे. आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. जिया खानने देखील आत्महत्या केली होती मात्र तिच्या प्रकरणात अजुनही कोणाला दोषी ठरवण्यात आलेलं नाही.    

mahesh bhatt putting hand around jiah khan old video viral on social media  

loading image
go to top