कपिल शर्मासोबत पुन्हा झळकणार सुनील ग्रोव्हर?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 25 August 2020

टीव्ही इंडस्ट्रीची गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर जेव्हा कपिल शर्मा शोपासून वेगळा झाला होता तेव्हा त्यानंतही तो अनेक शोमध्ये दिसून आला होता. शो सोडल्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं.

मुंबई- टीव्ही इंडस्ट्रीची गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर जेव्हा कपिल शर्मा शोपासून वेगळा झाला होता तेव्हा त्यानंतही तो अनेक शोमध्ये दिसून आला होता. शो सोडल्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं. सुनील ग्रोवर लवकरंच एक नवीन शो घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान.' या शोमध्ये सुनील ग्रोवर 'बिग बॉस'ची एक्स स्पर्धक शिल्पा शिंदेसोबत दिसणार आहे.

हे ही वाचा:  दीपिका पदूकोण सप्टेंबरमध्ये सुरु करणार 'या' सिनेमाचं शूटींग, श्रीलंकेला जाण्याचा प्लान तुर्तास रद्द

सुनील ग्रोवर या शोसाठी खूप उत्सुक आहे. या शोमधून तो टीव्हीवर कमबॅक करत आहे. यामध्ये सुनील ग्रोवरसोबत प्रसिद्ध कॉमेडियन देखील दिसतील. शोचा प्रोमो देखील रिलीज झाला होता आणि चाहत्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यादरम्यानंच आता सुनील ग्रोवरने कपिल शर्मासोबत काम करण्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सुनीलने कपिलसोबत पुन्हा एकदा काम करण्यावर म्हटलं आहे, 'जर नशिबात माझं आणि कपिल शर्माचं एकत्र काम करणं लिहिलं असेल तर आम्ही नक्की करु. आत्ता तरी आमचा काहीही प्लान नाही. मी पुन्हा एकदा गुत्थी बनु इच्छित नाही. जेव्हाही माझा नवीन शो येतो तेव्हा लोक मला कपिल शर्माबाबत विचारतात. आम्ही कधी कधी एकमेकांसोबत बोलतो. मी जेव्हापासून शो सोडला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत खूप कालावधी लोटला आहे. वेळ अनेक गोष्टी बदलते.'

एका मुलाखतीत सुनील ग्रोवरने सांगितलं होतं की त्याने 'गँग्स ऑफ फिल्मीस्तान' या शोसाठी त्याच्या मानधनामध्ये कपात केली आहे. त्याने म्हटलं होतं, 'मला असं वाटतं की आता जी परिस्थिती आहे त्यात आपण कमी मानधन घेतलं पाहिजे. आपण इतरांच्या पोटापाण्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. मी निर्णय घेतला आहे की या शोमधून होणारी कमाई मी दान करणार आहे.'  

sunil grover said this to kapil sharma praising his gangs of filmistan show  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil grover said this to kapil sharma praising his gangs of filmistan show