'लॉकडाउन हे काही उत्तर नाही'; ट्रोलिंगनंतरही महेश कोठारे ठाम

'तुमच्या घरात कोणी पॉझिटिव्ह आला तर..' म्हणत महेश कोठारेंवर नेटकऱ्यांनी केली टीका
mahesh kothare
mahesh kotharetwitter

राज्यातील कोरोना संसर्गाची साखडी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस म्हणजे १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनप्रमाणे सर्व व्यवहार या काळात बंद राहणार नाहीत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा-टॅक्सी, उपनगरीय रेल्वे, आरोग्य सेवा सुरू राहणार असल्या तरी सबळ कारणांशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही किंवा खासगी वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. 'कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी लॉकडाउन हे काही उत्तर नाही', असं ट्विट मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी केलं. मात्र त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रोलिंगनंतरही आपल्या मतावर ठाम असल्याचं आणखी एक ट्विट त्यांनी केलं.

महेश कोठारेंचं ट्विट

'या कोरोनामुळे वैतागलो आहे. हर्ड इम्युनिटी हाच एकमेव उपाय या महामारीवर आहे, असं मला वाटतं. या विषाणूला हरवण्यासाठी आपल्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवावीच लागेल. लॉकडाउन हे काही उत्तर नाही. गेल्या वर्षी आपण महिन्याभरापेक्षा जास्त काळ लॉकडाउनमध्ये राहिलो, पण त्याचा काही उपयोग झाला का? नाही. सर्वांचं लसीकरण होणं आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियम काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. आपण त्यावर मात करू शकतो. पण लॉकडाउन हे उत्तर नाही', असं ट्विट महेश कोठारे यांनी केलं.

महेश कोठारेंच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 'यांना कोरोना झाला तर सर्व सोयीसुविधा मिळणार म्हणून बोलायला सुचतंय', असं एकाने लिहिलं. तर 'तुमच्या घरात कोणी पॉझिटिव्ह आला तर कळेल लॉकडाउन पाहिजे की नाही', असं दुसऱ्याने म्हटलं. सध्या तरी लॉकडाउन हेच उत्तर असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी कोठारेंच्या विधानाला तीव्र विरोध केला. त्यानंतर आणखी एक ट्विट करत महेश कोठारेंनी आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं. 'माझ्या विधानावर टीका करणाऱ्या सर्वांसाठी माझं हेच उत्तर आहे की लॉकडाउन हे काही उत्तर नाही', असं ट्विट त्यांनी केलं.

हेही वाचा : ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉयचा कोरोनाशी सामना; कुटुंबीयसुद्धा पॉझिटिव्ह

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८,९५२ रुग्ण आढळले, तर २७८ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सहा लाखांपेक्षा अधिक झाली. राज्यात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ३५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. देशात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असून, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com