'शाहरुखने आपल्या प्रतिभेला पूर्णपणे न्याय दिला नाही'| Mahesh Manjkrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar
'शाहरुखने आपल्या प्रतिभेला पूर्णपणे न्याय दिला नाही'

'शाहरुखने आपल्या प्रतिभेला पूर्णपणे न्याय दिला नाही'

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नेहमीच आपले विचार प्रखरपणे मांडतात. ते कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीबद्दल त्यांची मतं आणि विचार स्पष्टपणे मांडताना दिसतात. शाहरुख खान फक्त भारताचाच नाही तर एक ग्लोबल सुपरस्टार आहे. बॉलिवूडमध्ये त्याचं काय स्थान आहे हे तर सगळ्यांना माहिती असूनही अलीकडेच महेश मांजेरकर यांनी शाहरुखने त्याची जी प्रतिभा आहे, त्याला योग्य तो न्याय दिला नाही असं म्हटलं आहे.

नुकत्याचं एका मुलाखतीत महेश यांनी बॉलिवूड कलाकारांबद्दल विशेष म्हणजे शाहरूख खानबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "मला असं वाटतं, असा एक अभिनेता आहे ज्याने आपल्या प्रतिभेला पूर्णपणे न्याय दिला नाही, तो म्हणजे शाहरुख खान आहे . त्याची समस्या ही आहे की त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं नाहीये. त्याला त्याच्या चित्रपटाला सुरक्षेच्या वर्तुळात ठेवायचं असतं, जे तो नेहमी स्वत:ला ठेवतो आणि मला वाटतं की त्याला यातून बाहेर येण्याची गरज आहे."

पुढे त्यांनी शाहरुखची तुलना रणवीर सिंग आणि रणबीर कपूरशी केली म्हणाले, “शाहरुख आज रणबीर कपूर किंवा रणवीर सिंग करत असलेली भूमिका करत आहे. मग लोकांना शाहरुख कसा दिसेल? प्रेक्षकांना शाहरुखला अशा भूमिकांमध्ये पाहायला आवडेल, ज्यात त्यांना ही भूमिका फक्त शाहरुखच करू शकतो असं वाटेल. कुठेतरी मला असं वाटतं की त्याने बॉक्सच्या बाहेर काहीतरी केलं पाहिजे कारण तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे."

नुकत्याचं एका मुलाखतीत महेश यांनी बॉलिवूड कलाकारांबद्दल विशेष म्हणजे शाहरूख खानबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "मला असं वाटतं, असा एक अभिनेता आहे ज्याने आपल्या प्रतिभेला पूर्णपणे न्याय दिला नाही, तो म्हणजे शाहरुख खान आहे . त्याची समस्या ही आहे की त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं नाहीये. त्याला त्याच्या चित्रपटाला सुरक्षेच्या वर्तुळात ठेवायचं असतं, जे तो नेहमी स्वत:ला ठेवतो आणि मला वाटतं की त्याला यातून बाहेर येण्याची गरज आहे."

शाहरूख हा शेवटचा झिरो या चित्रपटात दिसला होता यानंतर त्याने खूप काळ ब्रेक घेतला आहे, पण लवकरच तो पठान या चित्रपटामध्ये दिसणार असून या चित्रपटाची शूटिंग सध्या चालू आहे. तर महेश यांचा सलमान खानसोबतचा अंतिम हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं दिगदर्शन महेश यांनीच केलं आहे.