Big Boss Marathi 4: प्रसादचं नाव घेत मांजरेकरांनी जाहीर केलं १ करोडचं बक्षिस; म्हणाले,'जो कुणी याच्या..'Mahesh Manjrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar announced 1 Crore prize, said, who is going  find what cooking in prasad mind,we will pay him/her 1 crore.

Big Boss Marathi 4: प्रसादचं नाव घेत मांजरेकरांनी जाहीर केलं १ करोडचं बक्षिस; म्हणाले,'जो कुणी याच्या..'

Big Boss Marathi: बिग बॉस मराठी ४ चा शो दिवसेंदिवस रंगताना दिसत आहे. इथं कधी सदस्यात वाद होतात कधी मैत्रीचे बंध फुलतात, कधी जुन्या आठवणीत कुणी रंगून जातं तर कुणी भविष्याच्या प्लॅन्सविषयी खुलासा करताना दिसतं. आता हळूहळू प्रेक्षकही घरात असलेला कोणता कलाकार स्वभावानं खरा कसा आहे याचा अंदाज बांधू लागलेयत. पण घरात अनेकदा आक्रमक मूडमध्ये दिसणाऱ्या प्रसाद जवादेच्या बाबतीत मात्र सारेच अंदाज फोल ठरतायत. त्यामुळे आता महेश मांजरेकरांनी प्रसादच्या बाबतीत बिग बॉसच्या मंचावरनं आव्हान केलं आहे. (Mahesh Manjrekar announced 1 Crore prize, said, who is going find what cooking in prasad mind,we will pay him/her 1 crore.)

हेही वाचा: Exclusive:'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच..','हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

बिग बॉसच्या चावडीवरनं महेश मांजरेकर हे आव्हान प्रेक्षकांसमोर करणार आहेत. सध्या यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावरनं जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतोय की बिग बॉस मराठीच्या चावडीवर सगळे सदस्य मांजरेकरांसमोर हजर झालेयत. तेवढ्यात मांजरेकर असं काही बोलून गेलेयत की घरातल्या सदस्यांमध्ये एकच हशा पिकला आहे.

मांजरेकर त्या प्रोमो व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत, ''प्रसादच्या डोक्यात काय चाललंय हे शोधणाऱ्यास मी १ करोड रुपयांचे बक्षिस देईन'', आता यावरनं आपल्याला कळालंच असेल की प्रसाद जवादे नेमके काय गेम प्लॅन करतोय याबाबतीत प्रेक्षकच नाहीत तर दस्तुरखुद्द मांजेरकरही हैराण आहेत. माजंरेकरांनी आपल्या मजेदार अंदाजात १ करोड रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. जे ऐकून चावडीवर जमलेल्या सगळ्याच सदस्यांना आपलं हसू आवरलं नाही. हा प्रोमो व्हिडीओ आम्ही बातमीत जोडलेला आहे तो पाहता येईल आपल्याला.